ना. धो. महानोरांकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील भाषणाचं पत्र लिहून कौतुक

मुंबई : ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाचं कौतुक केलंय. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन केलेलं भाषण हे अत्यंत मुद्देसूद आणि ऐकणाऱ्यांना संपूर्ण हेलावणारं होतं, असं ना. धो. महानोर यांनी पत्राद्वारे म्हटलंय. आपल्या भाषण शैलीत उत्स्फूर्तपणा आणि जिवंतपणा होता, असं ते म्हणाले. देशाप्रतीची खरी कळकळ आपल्या भाषणातून …

ना. धो. महानोरांकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील भाषणाचं पत्र लिहून कौतुक

मुंबई : ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाचं कौतुक केलंय. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन केलेलं भाषण हे अत्यंत मुद्देसूद आणि ऐकणाऱ्यांना संपूर्ण हेलावणारं होतं, असं ना. धो. महानोर यांनी पत्राद्वारे म्हटलंय. आपल्या भाषण शैलीत उत्स्फूर्तपणा आणि जिवंतपणा होता, असं ते म्हणाले.

देशाप्रतीची खरी कळकळ आपल्या भाषणातून दिसून आली. व्यंग दाखविण्याची आणि त्याची सडेतोड चिरफाड करण्याची आपली कला जन्मजात आहेच. आणीबाणीच्या प्रचंड अस्वस्थतेनंतर निवडणुका असताना आदरणीय पु.ल.देशपांडे यांनी महाराष्ट्रात विराट सभा घेत त्याची चिरफाड केली होती. ही महत्त्वाची ऐतिहासिक नोंद आहे. तेच आज आपण करत आहात असं सांगत ना. धो. महानोर यांनी राज ठाकरेंचे अभिनंदन केलं तसेच शुभेच्छा दिल्या.

VIDEO : राज ठाकरे यांचं शिवतीर्थावरील संपूर्ण भाषण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *