शिवरायांबद्दल बरळणारा श्रीपाद छिंदम दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अहमदनगर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील संघटीत गुन्हा करणारे 15 टोळीतील 67 लोकांवर दोन वर्षापर्यंत हद्दपारीची कारवाई करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी दिलाय. या हद्दपार केलेल्यांमध्ये शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्यासह शहरातील अनेक जणांची नावे आहेत. छिंदमने नुकत्याच झालेल्या अहमदनगर …

shripad chindam, शिवरायांबद्दल बरळणारा श्रीपाद छिंदम दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अहमदनगर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील संघटीत गुन्हा करणारे 15 टोळीतील 67 लोकांवर दोन वर्षापर्यंत हद्दपारीची कारवाई करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी दिलाय. या हद्दपार केलेल्यांमध्ये शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्यासह शहरातील अनेक जणांची नावे आहेत. छिंदमने नुकत्याच झालेल्या अहमदनगर महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता.

जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा या हद्दपारांमध्ये समावेश आहे. जीवे मारण्याची धमकी, हत्या, सरकारी कामात अडथळा, मारामारी करणे, कायदा व सुव्यवस्था बिघडवणे, शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, महिलांशी गैरवर्तन, खंडणी मागणे, फसवणूक, दरोडा, जबरी चोरी, जनावरांची कत्तल यांसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय.

नगरसेवक श्रीपाद छिंदमही हद्दपार

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यानंतर श्रीपाद छिंदमवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. श्रीपाद छिंदमला यापूर्वी नगर महापालिका निवडणुकीच्या वेळीही जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं. जिल्ह्याबाहेर राहूनही श्रीपाद छिंदम जिंकून आला होता. महापालिका सभागृहातही श्रीपाद छिंदमला मारहाण करण्यात आली होती.

shripad chindam, शिवरायांबद्दल बरळणारा श्रीपाद छिंदम दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *