Power Generation | कोराडी केंद्राचा वीज उत्पादनाचा नवा विक्रम, कोळशाचा तुटवडा असताना उत्पादनात वाढ

| Updated on: Jun 03, 2022 | 5:29 PM

विजेचे उत्पादन वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं विजेची जास्त गरज आहे. अशावेळी उत्पादनात वाढ झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होत आहे. कोळशा पुरेशा प्रमाणात असल्यास वीज उत्पादनात वाढ होते. पण, कमीत-कमी कोळशातही विजेचे उत्पादन वाढवून फार मोठी कामगिरी कोराडीच्या वीज केंद्राने केली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी आहे.

Power Generation | कोराडी केंद्राचा वीज उत्पादनाचा नवा विक्रम, कोळशाचा तुटवडा असताना उत्पादनात वाढ
कोराडी केंद्राचा वीज उत्पादनाचा नवा विक्रम
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : 1980 मेगावाट क्षमतेच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राने (Thermal Power Station) मे 2022 मध्ये तब्बल 1192 दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली. हा वीज उत्पादनाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वाणिज्यिक तत्वावर संचलन सुरू झाल्यापासून प्रथमच अश्या प्रकारचा विक्रम (Vikram) आहे. यावर्षीच्या मार्चमध्ये 1158 दशलक्ष युनिट इतकी वीज निर्मिती झाली होती. पुढच्या दोन महिन्यांतच वीज केंद्राने वीज उत्पादनाचा (Power Generation) हा विक्रमी टप्पा गाठलेला आहे. विशेष म्हणजे, वीज निर्मितीचा मार्च 2022 मध्ये असलेला भारांक 78.66 टक्क्यांवरून 80.94 टक्के इतका वाढला आहे.

कमी कोळशात जास्त उत्पादन

विजेचे उत्पादन वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं विजेची जास्त गरज आहे. अशावेळी उत्पादनात वाढ झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होत आहे. कोळशा पुरेशा प्रमाणात असल्यास वीज उत्पादनात वाढ होते. पण, कमीत-कमी कोळशातही विजेचे उत्पादन वाढवून फार मोठी कामगिरी कोराडीच्या वीज केंद्राने केली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी आहे.

महानिर्मितीची सर्वोच्च कामगिरी

कोराडी वीज केंद्रातील संच क्रमांक 10 मध्ये मे महिन्यात सुमारे 936 कोल रेक्स प्राप्त झाल्या होत्या. दररोज सरासरी 30.19 रेक्स प्राप्त झाल्या. कोळशाचा तुटवडा असतानाही केंद्राने विक्रमी वीज उत्पादन केले आहे. महानिर्मितीच्या इतिहासातील ही सर्वोच्च कामगिरी आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या कुशल नेतृत्वात हे यश प्राप्त झाले.

हे सुद्धा वाचा

सांघिक प्रयत्नांचे फलित

संचालक (खनिकर्म ) पुरुषोत्तम जाधव, संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे तसेच संचलन व सुव्यवस्था आणि इंधन व्यवस्थापन चमूच्या उत्तम समन्वयातून हे यश प्राप्त झाले आहे. या दैदिप्यमान कामगिरीबाबत संजय खंदारे यांनी महानिर्मितीच्या सर्व संबंधित संचालक, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते व त्यांच्या अधिनस्त चमूचे अभिनंदन केले आहे. सांघिक प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ही यशस्वी घोडदौड आगामी काळात निरंतर सुरु ठेवून पावसाळ्यात राज्यातील जनतेला अखंडित वीज उत्पादन देण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध रहावे, असे आवाहन संजय खंदारे यांनी केले.