Chandrapur Fire | चंद्रपुरातील संरक्षित जंगलात आग, 24 हेक्टर जंगल जळाले, आग लावणाऱ्या आरोपीस बेड्या

किसन जांभुळे यांना शेतातील धुरे-बांध जाळत असताना संबंधित कर्मचारी यांनी कळविले होते. परंतु आरोपीने हेतुपरस्पर जंगलाला आग लावली. वन व वन्यजीवांचे आश्रयस्थान नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित आरोपी यांच्याविरुध्द वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय.

Chandrapur Fire | चंद्रपुरातील संरक्षित जंगलात आग, 24 हेक्टर जंगल जळाले, आग लावणाऱ्या आरोपीस बेड्या
चंद्रपुरातील संरक्षित जंगलात आग, आग लावणाऱ्या आरोपीस बेड्याImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 1:34 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील भासुनशिंड संरक्षित वनास (Forest) आग लागली होती. या आगीत सुमारे 24 हेक्टर जंगल जळाले. यात वनविभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग विझविल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. एका शेतकऱ्याने शेतातील धुऱ्यास आग लावली होती. या आगीने पेट घेतला. यात शेताशेजारील जंगलात आग लागल्याचे निष्पन्न झाले. यावरून आरोपीस अटक करण्यात आली. अशाप्रकारे वन्यजीवांना (Wildlife) तसेच वृक्षांना धोकादायक (Dangerous) पद्धतीनं जाळल्याप्रकरणी आरोपीवर वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 मे रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (कोअर) क्षेत्रातील ताडोबा वनपरिक्षेत्राचे अधिकारी-कर्मचारी गस्तीवर होते. भानुसखिंडी नियतक्षेत्रातील भानुसखिंडी संरक्षित वनात आग सुरू असल्याचे निदर्शनास आले.

24 हेक्टर जंगल जळाले

सदर अधिकारी-कर्मचारी हे वेळीच घटनास्थळी पोहचले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यानंतर आग लावलेल्या अज्ञात व्यक्तीची शोध मोहीम हाती घेतली. तपास सुरू केला असता वायगाव (भोयर) येथील किसन सदाशिव जांभुळे (वय 58 वर्षे) यांनी त्यांचे अतिक्रमण केलेल्या शेतात धुरे-बांध जाळण्याकरिता आग लावलेली होती. परंतु आगीने रौद्र रूप घेतल्याने त्यांच्या शेताला लागून असलेल्या भानुसखिंडी संरक्षित वनाला आग लागली. यात एकूण 24 हेक्टर जंगल जळाले आहे.

आग लावणाऱ्या शेतकऱ्यास अटक

किसन जांभुळे यांना शेतातील धुरे-बांध जाळत असताना संबंधित कर्मचारी यांनी कळविले होते. परंतु आरोपीने हेतुपरस्पर जंगलाला आग लावली. वन व वन्यजीवांचे आश्रयस्थान नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित आरोपी यांच्याविरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलमनुसार वनगुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीस 31 मे रोजी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास अटक करण्यात आली. या घटनेची चौकशी सतीश शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा, एस. एम. नन्नावरे क्षेत्र सहाय्यक, सोनेगाव, व्ही. डी. कामटकर, क्षेत्र सहाय्यक काटेझरी व पी.आर. कोसुरकर वनरक्षक व इतर कर्मचारी यांनी मिळून केली. पुढील तपास श्री खोरे सहाय्यक वनसंरक्षक यांचा मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.