AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोहर म्‍हैसाळकर यांचं निधन, विदर्भ साहित्‍य संघाचे होते अध्‍यक्ष

विदर्भ साहित्य संघाचे मॅनेजमेंट गुरू हरविल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मनोहर म्‍हैसाळकर यांचं निधन, विदर्भ साहित्‍य संघाचे होते अध्‍यक्ष
मनोहर म्‍हैसाळकर यांचं निधन
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Oct 14, 2022 | 8:45 PM
Share

सुनील ढगे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : विदर्भ साहित्‍य संघाचे (Vidarbha Sahitya Sangh) अध्‍यक्ष मनोहर म्‍हैसाळकर (Manohar Mhaisalkar) यांचं निधन झालं. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभ्‍यासू वक्‍ता, भाषा अभ्‍यासक, सर्जनशील लेखक, अभ्‍यासक व संशोधक अशी त्यांची ओळख होती. मनोहर म्‍हैसाळकर यांनी साहित्‍य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. गेल्‍या सोळा वर्षापासून विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदाची धुरा त्‍यांनी समर्थपणे सांभाळली.

विदर्भ साहित्य संघाचे मॅनेजमेंट गुरू हरविल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते. गुरुवारी त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात सायंकाळी सहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या नागपुरात त्यांच्या पार्थिवावर अत्यंसस्कार करण्यात येतील.

मनोहर म्हैसाळकर 2006 पासून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. त्यांनी विदर्भ साहित्य संघाचे कार्य राज्यभर पसरविले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हैसाळकर यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मनोहर म्हैसाळकर हे साहित्याच्या क्षेत्रातील आदरनीय नाव होतं. विदर्भ साहित्य संघाच्या उत्कर्षात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या रंजन कला मंदिरचे सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

महाराष्ट्र साहित्य पुणे पुरस्कृत पहिला भीमराव मराठी साहित्य उत्कृष्ट ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार मनोहर म्हैसाळकर यांना मिळाला होता. अनेक साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता.

प्राचार्य राम शेवाळकर वाड्.मयीन कार्यकर्ता पुरस्कारही मनोहर म्हैसाळकर यांना देण्यात आला होता.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,