AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर, कुणाला संधी मिळणार?

नागपूर :  स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपचा ओबीसी चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे आणि विक्की कुकरेजा यांची नावे आघाडीवर आहेत. तर, काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव आघाडीवर आहे. बावनकुळेंची नाराजी दूर करणार? गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे समर्थक […]

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर, कुणाला संधी मिळणार?
चंद्रशेखर बावनकुळे, राजेंद्र मुळक
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 10, 2021 | 11:06 AM
Share

नागपूर :  स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपचा ओबीसी चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे आणि विक्की कुकरेजा यांची नावे आघाडीवर आहेत. तर, काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव आघाडीवर आहे.

बावनकुळेंची नाराजी दूर करणार?

गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते. तरीही बावनकुळे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. कामठी-मौदा या त्यांच्या जुन्या मतदारसंघातून भाजपचेच टेकचंद सावरकर हे निवडूण आहे होते. ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुण्याईने अशी चर्चा होती. बावनकुळे हे विदर्भात ओबीसींचा चेहरा आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बावनकुळे यांना उमेदवारी देऊन भाजप ओबीसींची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे.

10 डिसेंबरला होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 6 सदस्यांची मुदत १ जानेवारी 2022 ला समाप्त होत आहे. यात नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. भाजपच्या गिरीश व्यास यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. या निवडणुकीसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 14 डिसेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीत महानगर पालिका, जिल्हा परिषदेचे सदस्य मतदान करतात.

गेल्या निवडणुकीत झाली होती तडजोड

गेल्या निवडणुकीत गिरीश व्यास यांनी काँग्रेसचे अशोकसिंग चव्हाण यांचे नाव जाहीर केले होते. परंतु, तडजोड झाल्याने गिरीश व्यास अविरोध निवडूण आले होते. गेल्या निवडणुकीत उमदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मुंबईची जागा काँग्रेसने भाई जगताप यांच्यासाठी, तर नागपूरची जागा भाई जगताप यांच्यासाठी सोडण्याची तडजोड करण्यात आली होती. त्यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र मुळक निवडूण आले होते.

भाजपचा अधिक मते असल्याचा दावा

या निवडणुकीत पालकमंत्री नितीन राऊत आणि मंत्री सुनील केदार यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. नागपूर महापालिकेत 151 सदस्य आहेत. यापैकी भाजपच्या नगरसेवकांची संख्या 108 आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या 58 आहे. येथे काँग्रेस आघाडीवर आहे. मतांची एकूण गोळाबेरीज केल्यास भाजपकडे 60 मते अधिक असल्याचा दावा केला जात आहे.

इतर संबंधित बातम्या

नागपूर: एक डिसेंबरपासून कोरोनाच्या पहिल्या डोससाठी मोजावे लागणार पैसे; मोफत लसीकरण बंद

video viral संतापजनक… पुण्यात भटक्या श्वानाची डोक्यात रॉड घालून हत्या ; तर नागपूरात शेपटीला बांधली फटाक्याची माळ

‘अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय, राजा आणि वजीर पुढे येत नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा इशारा नेमका कुणाकडे?

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ