AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अनिल देशमुख 14 महिने जेल का भत्ता खाके आया है”; वज्रमूठ सभेतून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिलाच

मी 14 महिने आर्थर रोड जेलमध्ये असल्याचे सांगत अनिल देशमुख 14 महिने जेल का भत्ता खाके आया है, अब कोई माय का लाल अनिल देशमुख को रोक नहीं सकता असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

अनिल देशमुख 14 महिने जेल का भत्ता खाके आया है; वज्रमूठ सभेतून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिलाच
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 16, 2023 | 8:16 PM
Share

नागपूर : महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा नागपूरात होत असताना मविआतील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बेरोजगारी, महागाई, बेकारी आणि गुन्हेगारी या विषयावरून भाजपवर सडकून टीका करण्यात आली.  यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी सांगितले की, मला खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.  यावेळी ज्यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप केला , तिच व्यक्ती न्यायालयात हजर राहिली नाही. ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांच्यामुळे मला 14 महिने आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागले आहे. खोटे आरोप करणे हेच भाजपचे काम असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

मला खोट्या गुन्ह्याखाली फसवलं गेलं असल्याचे सांगत, माझ्यावर शंभर कोटी रुपयांचा आरोप केला गेला मात्र माझ्यावर झालेल्या शंभर कोटींच्या आरोपानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना सांगितले की, चौकशी करा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ज्यावेळी मात्र एक वर्षांने हायकोर्टाने जो निकाल दिला गेला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप हे ऐकीव माहितीच्या आधारावर आहेत, त्याचा कोणाताही पुरावा नाही. माझ्यावर एवढे आरोप झाले आहेत की, सादर केलेल्या चार्जशीटमध्ये 1 कोटी 71 लाखांचा उल्लेख करण्यात आला होता.

मात्र तो कुणीही सिद्ध करू शकले नाहीत असा टोलाही त्यांनी भाजपला लागवला. यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितले की, माझ्यावर ज्याने आरोप केला तो देशाच्या बाहेर गेला होता. मी 14 महिने आर्थर रोड जेलमध्ये असल्याचे सांगत अनिल देशमुख 14 महिने जेल का भत्ता खाके आया है, अब कोई माय का लाल अनिल देशमुख को रोक नहीं सकता असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

अनिल देशमुख यांनी अवकाळी, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. आंबा, संत्री, मोसंबी, डाळींब उत्पादकांना अजूनही कोणतीच मदत सरकारने केली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टी होऊन सात-आठ महिन्या झाले त्यापूर्वी नुकसानग्रस्तांची पाहणी करून मदत देणार असल्याचे अश्वासन शिंदे-फडणवीस सरकारने दिले होते मात्र ते अश्वासन अजून पूर्ण झाले नाही असा टोलाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

Follow Us
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा