AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलेक्शनसाठी घरी गेला नि नियत फिरली, मुलगी ओरडल्यानं शेजाऱ्यांनी बदडले…

ही घटना आहे सक्करदरा पोलीस ठाण्यातली. कॅटरिंग व्यवसाय करताना युवतीचे मिथून पाटील याच्याशी चांगले संबंध होते. पण, गेल्या वर्षी तिचे लग्न झाले. तरीही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. तुझ्या पतीला आपल्या जुन्या संबंधाबद्दल सांगेन, अशी धमकी देत होता.

कलेक्शनसाठी घरी गेला नि नियत फिरली, मुलगी ओरडल्यानं शेजाऱ्यांनी बदडले...
क्राईम
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 22, 2021 | 6:28 PM
Share

नागपूर : कळमना परिसरात कलेक्शनसाठी घरी गेलेल्या एजंटची नियत फिरली. अकरा वर्षीय मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न त्यानं केला. पण, ती ओरडल्यानं शेजारी जमा झाले आणि त्याला चांगलाच प्रसाद खावा लागला.

कळमन्यात बँकेचा एजंट डेली कलेक्शनसाठी एका घरी गेला. तिथं त्याला अकरा वर्षीय मुलगी दिसली. घरी कुणीच नसल्याच पाहून त्याची नियत फिरली. त्यानं घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पण, ती चिमुरडी ओरडली. शेजारचे लोक जमा झाले. त्यांनी त्या एजंटला चांगलेच धुतले. पोलिसांना बोलावण्यात आले. तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली. राजू मानकर असं आरोपीचं नाव आहे.

विवाहितेशी लगट करणाऱ्यावर गुन्हा

ही घटना आहे सक्करदरा पोलीस ठाण्यातली. कॅटरिंग व्यवसाय करताना युवतीचे मिथून पाटील याच्याशी चांगले संबंध होते. पण, गेल्या वर्षी तिचे लग्न झाले. तरीही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. तुझ्या पतीला आपल्या जुन्या संबंधाबद्दल सांगेन, अशी धमकी देत होता. भेटायला बोलावत होता. तिचे लग्न झाल्यानं ती त्याला भेटू शकत नव्हती. ती नकार देत होती. त्यामुळं मिथूननं तिचा पाठलाग सुरू केला. मोबाईलवर अश्लील मॅसेजेस पाठवित असे. दरम्यान, तिच्या पतीला मिथून तिचा पाठलाग करताना दिसला. तीनं सारी हकिकत पतीला सांगितली. त्यांनी मिथून विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिथूनवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.

25 वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील 25 वर्षीय नवल शिवचरण कनपुरिया या युवकाचा आज नवतलावात बुडून मृत्यू झाला. मृतक हा आपल्या घराजवळील धन्नालाल रामटेके यांच्या इथे अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत घराजवळील नवतलावात सकाळी आंघोळ करण्याकरिता गेला होता. तो पाण्यामध्ये खोलवर गेल्याने त्याच्या मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. नवल कनपुरिया यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आलाय. मृतदेहाच्या पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे.

धक्कादायक: रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी, हिंगोलीत जवानाचा मृत्यू!

एटीएममध्ये बिनधास्त धुसला अन् मशीन फोडू लागला, सायरन वाजता पळाला, औरंगाबादमध्ये एकजण ताब्यात

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती