सहा तरुण तलावात बुडाले, बाप्पाचं विसर्जन करताना दुर्घटना

विसर्जनासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व तरुणांचे मृतदेह मिळाले असून म्हसावाद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

सहा तरुण तलावात बुडाले, बाप्पाचं विसर्जन करताना दुर्घटना

नंदुरबार : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू (drown in water) घडल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली. शहादा तालुक्यातील वडछील गावातील ही घटना (drown in water) आहे. विसर्जनासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व तरुणांचे मृतदेह मिळाले असून म्हसावाद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

जिल्हाभरात पाचव्या दिवसाच्या गणपीतचं विसर्जन केलं जातंय. त्यामुळे गावातील चित्रकथे कुटुंबातील मुलं बाप्पाच्या विसर्जनासाठी गेले. विसर्जनासाठी बाप्पाला पाण्यात घेऊन गेले, मात्र अचानक खोल पाणी असल्याचं मुलांच्या लक्षात आलं नाही. यामुळे सर्वच्या सर्व मुलं बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या तरुणांची नावं

  • कैलास संजय चित्रकथे
  • सचिन सुरेश चित्रकथे
  • रविंद्र शंकर चित्रकथे
  • विशाल मंगल चित्रकथे
  • दीपक सुरेश चित्रकथे
  • सागर आप्पा चित्रकथे
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *