Nashik | नगरपंचायतीच्या 8 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात; मंगळवारी मतदान, बुधवारी निक्काल!

| Updated on: Jan 16, 2022 | 7:05 AM

नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत.

Nashik | नगरपंचायतीच्या 8 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात; मंगळवारी मतदान, बुधवारी निक्काल!
Nagar Panchayat Election
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 8 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात असून, यासाठी मंगळवारी मतदान होणार आहे, तर बुधवारी 19 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यात तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 12 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे देवळा येथे 4, निफाड 3, कळवण आणि दिंडोरी येथे प्रत्येक 2 जागांवर अशा एकूण 11 जागांची निवड स्थगित करून येथे सोडत काढून पुन्हा प्रक्रिया घेण्यात आली. या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दरम्यान कळवण येथील प्रभाग क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा पगार, तेजस पगार आणि देवळा येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे अशोक आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

प्रतिष्ठेची निवडणूक

नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायतींची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे तीन मंत्री प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सुरगाणा येथे तळ ठोकून होते. कृषिमंत्री दादा भुसे यांनी सुरगाणा, पेठ आणि कळवण तालुका पिंजून काढत या भागात त्यांच्या रॅली आणि सभा घेतल्या. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही प्रचारासाठी जिल्ह्यात तळ ठोकला होता. तर पालकमंत्री छगन भुजबळांनी विदर्भात प्रचार केला. त्यामुळे या निवडणुकीची जोरदार चर्चा आतापासूनच रंगलीय. कोण निवडून येणार याचे तर्कवितर्क लावले जात आहे.

पहिल्या टप्प्यात 292 उमेदवार रिंगणात

नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मंगळवार, 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या नगरपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर मतदान झाले. देवळा येथे फक्त 11 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे. दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे.

निकालाकडे लक्ष

पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जणांमध्ये निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे. या सर्व ठिकाणचा निकाल 19 जानेवारी रोजी लागणार आहे.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली