AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी कधीपर्यंत कराल अर्ज; काय आहे पात्रता, विद्यार्थ्यांना कसा मिळेल लाभ?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, त्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधेसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

Nashik | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी कधीपर्यंत कराल अर्ज; काय आहे पात्रता, विद्यार्थ्यांना कसा मिळेल लाभ?
संग्रहित छायाचित्र.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Feb 03, 2022 | 7:10 AM
Share

नाशिकः अनुसूचित जाती (Scheduled Castes) आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेंतर्गत मॅट्रीकोत्तर शिक्षण व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. याकरिता पात्र विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक (Nashik) कार्यालयातून विनामूल्य अर्ज प्राप्त करून तपासणी सूचीतील कागदपत्रांप्रमाणे विहीत मुदतीत परिपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2016-2017 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, त्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधेसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

अशी मिळेल मदत…

नाशिक शहरासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये असे प्रति विद्यार्थी 51 हजार रुपये देण्यात येणार आहेत. याबरोबरच या रक्कमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येणार आहे.

त्यांनाही मिळणार लाभ…

या योजनेंकरिता 2020-2021 व 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार 22 डिसेंबर 2021 रोजीच्या शासनाच्या परिपत्रकान्वये या कालावधीत शाळा, महाविद्यालये बंद होती. यादरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण घेतले आहे, त्यांना देखील स्वाधार योजनेचा लाभ मिळण्याकरिता या शैक्षणिक वर्षासाठी पात्र ठरविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी…

पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुला जवळ, नाशिक पुणे रोड येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0253-2975800 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

असे आहेत पात्रतेचे निकष

– विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. – 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत. – विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे. – विद्यार्थी स्थानिक नसावा व शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसावा. – विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँकेशी संलग्न केलेला असावा. – 12 वी नंतर पदवी व पदव्युत्तर अशा मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा व अभ्यासक्रम 2 वर्षापेक्षा कमी नसावा. – अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणमर्यादा 40 टक्के आवश्यक आहे. – जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजेच नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत 5 किलो मीटर परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. – अर्जासोबत भाडे तत्वावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी भाडेकरार व शेवटचा वर्ग पास झाल्याची गुणपत्रिका अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. – संपर्कासाठी विद्यार्थ्याने त्याचा चालू स्थितीतील संपर्क क्रमांक देणे बंधनकारक आहे.

इतर बातम्याः

Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या