Nashik | बेघरांच्या मदतीला कार्डिअन धावली, आता प्रवासाचीही करणार सोय…!

| Updated on: Jan 27, 2022 | 3:42 PM

नाशिकमध्ये ठिकठिकाणी निवारा शेडची किती आवश्यकता आहे, हे यानिमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे नाशिकचे महापौर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या समोर फाउंडेशनतर्फे हा प्रश्न मांडण्यात येणार आहे.

Nashik | बेघरांच्या मदतीला कार्डिअन धावली, आता प्रवासाचीही करणार सोय...!
नाशिकमध्ये बेघरांना मदत करण्यात आली.
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) तीर्थक्षेत्र. अनेकजण या ठिकाणी पोटाची खळगी भरायला येतात. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची असते, की त्यांना चक्क उघड्यावर झोपावे लागते. डोक्यावर छप्परही नसते. सध्या सुरू असलेल्या थंडीच्या लाटेमुळे अशा निर्वासितांचे प्रचंड हाल सुरूयत. हेच ध्यानात घेता नाशिकमधील कार्डिअन करेक्ट इंटरनेशनल (Cardian Correct International)फाउंडेशनने प्रजासत्ताक दिनानिमित्त निवारा नसलेल्यांना बोचऱ्या थंडी पासून बचाव व्हावा यासाठी ब्लँकेट, चादर आणि वाटप करण्यात आले. सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे, सह संगठन मंत्री शरद जाधव यांच्या उपस्थितीत या साहित्याचे वाटप करण्यात आले. गंगेच्या काठावर, बस स्थानकामध्ये, रस्त्याच्या कडेला किंवा पुलाखाली थंडीत झोपलेल्या नागरिकांना ऊब देण्यात आली. यावेळी कार्डियन करेक्ट फाऊंडेशनचे योगिता अमृतकर, वेणू पवार, गोकुळ पुरकर, रोशन बदाण, राजेंद्र बागुल, काही विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

कार्याला प्रोत्साहन

नाशिक शहरातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक संस्थांनीही अशाच प्रकारचा उपक्रम राबवत असल्याचे दिसून आले. यावेळी सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांनी मुस्लिम बांधवांना त्यांच्या कार्याबद्दल शुभ संदेश देत समाजाप्रती अशीच संवेदना सातत्याने दाखविण्याची गरज व्यक्त करत त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले. रात्री 11 ते पहाटे एक वाजेपर्यंत गोदावरी नदीच्या तीरावर रामकुंड, तपोवन, अमरधाम चा परिसर तसेच जुने सीबीएस, नवीन सीबीएस इत्यादी ठिकाणी उघड्यावर झोपलेल्या गोरगरीब नागरिकांना कार्डियन करेक्ट संस्थेने थंडी पासून बचाव करण्यासाठी अल्पशी मदत केली.

मदतीसाठी आवाहन

यावेळी उपस्थितांनी बेघरांचे प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक नागरिकांना आपापल्या गावी जावयाचे आहे. मात्र, जाण्याची व्यवस्था नाही. त्यांच्याकडे ओळखीचा पुरावा नसल्यामुळे त्यांना रेल्वे प्रवास करता येत नाही असे दिसून आले. अशा नागरिकांना यापुढे आपापल्या गावी पाठवण्यासाठी कार्डिअन करेक्ट संस्था प्रयत्न करणार आहे. ज्या सेवाभावी नागरिकांना अशा कामात सहकार्य करण्याची इच्छा आहे, त्यांनी आपली माहिती कार्डिअन करेक्ट संस्थेला 8412995454 या व्हाट्स अँप क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नाशिकमध्ये ठिकठिकाणी निवारा शेडची किती आवश्यकता आहे, हे यानिमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे नाशिकचे महापौर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या समोर फाउंडेशनतर्फे हा प्रश्न मांडण्यात येणार आहे, असे रोशन बधाण यांनी सांगितले.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!