AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी राज्यातील मुदत संपलेल्या एकूण 208 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केलाय. त्यात अ वर्गातील 83, ब वर्गातील 68 आणि क वर्गातील 120 नगरपरिषदा आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील मनमाड, सिन्नर, येवला, भगूर, नांदगाव, सटाणा आणि चांदवड या नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे.

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?
प्रातिनिधिक छायाचित्र
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Feb 23, 2022 | 9:37 AM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेच्या पाठोपाठ आता जिल्ह्यात पुन्हा एकदा 7 नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे (State Election Commission) सचिव किरण कुरुंदकर यांनी राज्यातील मुदत संपलेल्या एकूण 208 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना (Ward formation) कार्यक्रम जाहीर केलाय. त्यात अ वर्गातील 83, ब वर्गातील 68 आणि क वर्गातील 120 नगरपरिषदा आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील मनमाड, सिन्नर, येवला, भगूर, नांदगाव, सटाणा आणि चांदवड या नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांचा बार उडाल्यानंतर साधारणतः जून महिन्यांमध्ये या निवडणुका होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कसा आहे कार्यक्रम?

येत्या 2 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान प्रभाग सीमांची प्रसिद्धी, हरकती, सूचना मागवून त्यावर सुनावणी घेण्यात येईल. प्रभागांची संख्या, अनुसूचित जाती, जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा ही माहिती 2 मार्चपर्यंत सादर करावी लागेल. त्याला 7 मार्च रोजी राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देतील. यावरच्या हरकती आणि आक्षेप 10 ते 17 मार्चपर्यंत नोंदवता येतील. त्यावर 22 मार्च रोजी सुनावणी होईल. याचा अहवाल जिल्हाधिकारी 25 मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवतील. त्यानंतर 1 एप्रिलला अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येईल. ही माहिती 5 एप्रिल रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल. नगरपरिषदांच्या वेबसाईट आणि स्थानिक पातळीवर ही माहिती पाहायला मिळेल.

कुठे कोणाचे वर्चस्व?

नाशिक जिल्ह्यातील निवडणुका होणाऱ्या 7 नगर परिषदांपैकी 4 नगरपालिकांवर शिवसेना, 2 नगरपालिकांवर भाजप आणि 1 नगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. सटाण्यात एकूण 21 सदस्य आहेत. तिथे भाजप-शहर विकास आघाडीची सत्ता होती. नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे सुनील मोरे, तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे दीपक पाकळे होते. चांदवड नगरपालिकेवर काँग्रेसचा दबदबा होता. येथे 17 सदस्य आहेत. नगराध्यक्षपदी रेखा गवळी, तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र शेलार होते. येवल्यात एकूण 24 सदस्य आहेत. येथे नगराध्यक्षपदी भाजपचे बंडू क्षीरसागर आणि उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुरेश पटणी आहेत.

4 ठिकाणी शिवसेना

नांदगावमध्ये एकूण 17 सदस्य आहेत. येथे शिवसेनेचे राजेश कवडे हे नगराध्यक्ष आणि कारभारी शिंदे उपनगराध्यक्ष होते. सिन्नर नगरपालिकेत 28 सदस्य आहेत. येथे शिवसेनेचे किरण डगळे नगराध्यक्ष आणि बाळासाहेब उगले उपनगराध्यक्ष होते. मनमाडमध्ये एकूण 31 सदस्य आहेत. येथे शिवसेनेच्या पद्मावती धात्रक नगराध्यक्ष, राजेंद्र आहिरे उपनगराध्यक्ष होते. भगूर येथे 17 सदस्य आहेत. येथे शिवसेनेच्या अनिता करंजकर नगराध्यक्ष आणि सुरेश वालझाडे उपनगराध्यक्ष होते.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...