Nashik IT Company : 20 ते 25 वयोगटातील मुली टार्गेट, त्यांना एकटं बसवायचे आणि..नाशिक TCS मधील धक्कादायक पॅटर्न उघड

Nashik IT Company : निदा खान जी आहे, तिला लेडी कॅप्टन बोलायचे. ती मुलींशी मैत्री करायची. महिला स्टाफला सहजता जाणवेल अशी ती वागायची. त्यानंतर त्यांना नमाज अदा करण्यासाठी, हिजाब घालण्यासाठी तयार करायची असं पोलिसांनी सांगितलं.

Nashik IT Company : 20 ते 25 वयोगटातील मुली टार्गेट, त्यांना एकटं बसवायचे आणि..नाशिक TCS मधील धक्कादायक पॅटर्न उघड
Nashik IT Company
| Updated on: Apr 16, 2026 | 9:27 AM

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील नामवंत आयटी कंपनी आहे. TCS मधील बाहेर आलेल्या प्रकरणामुळे महाराष्ट्र चांगलाच हादरला आहे. नाशिकच्या TCS मध्ये हे सर्व घडलं आहे. नाशिकच्या TCS मध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने समोर येऊन तिथे तरुण महिलांना कशा प्रकारे टार्गेट केलं जायचं? त्यांचा पॅटर्न काय होता? या बद्दल माहिती दिली आहे. “ज्या महिलांना टार्गेट करायचय त्यांना एकटं पाडलं जायचं. त्यांना वेगळं बसवलं जायचं. त्यांना इमारतीच्या गच्चीवर कामाला बसवलं जायचं. फोन आणि खासगी वस्तू जप्त केल्या केल्या जायच्या. हा टार्गेट करण्याचा पॅटर्न आहे” असं या महिला कर्मचाऱ्याचं मत आहे.

ज्या महिलेने हे सर्व सांगितलं ती गेल्या सहावर्षांपासून TCS मध्ये नोकरीला आहे. व्हिडिओ कॉलवरुन ती एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलली. तिने सांगितलं की, “तिची नाशिक TCS ऑफिसला बदली करण्यात आली. त्यानंतर तिला मुख्य इमारतीपासून लांब गच्चीवर स्वतंत्रपणे काम करण्यासाठी बसवण्यात आलं. मला गच्चीवर एकट्याला काम करण्यासाठी बसवायचे. माझा फोन,बॅग जप्त करण्यात आलेलं” असं तिने सांगितलं. “मी वॉशरुम किंवा अन्य कुठल्या कारणांसाठी जेव्हा पाऱ्या उतरुन खाली यायचे तेव्हा सुरक्षा किंवा अन्य काही कारणांखाली माझा मोबाइल फोन, बॅग आणि अन्य वस्तू जप्त केल्या जायच्या” असं ती म्हणाली.

तिथे एचआरच घाबरलेली होती

“कंपनीत काम करणाऱ्या अनेक तरुण कर्मचाऱ्यांचा शोषण होताना आम्ही पाहिलय. त्यांचं ब्रेनवॉश केलं जायचं” असं ही महिला म्हणाली. “20 ते 25 वयोगटातील मुली सॉफ्ट टार्गेट असायच्या” असं या महिला कर्मचाऱ्याने सांगितलं. “त्यांना असं वाटायचं की, यांना अडकवणं सोपं आहे. तुम्हाला काही तक्रारी असतील तर तुम्ही त्या एचआरकडे घेऊन जाता. पण तिथे एचआरच घाबरलेली होती. देवाची कृपा आहे माझ्यावर. मी नशिबाने वाचली. आज जे इतरांसोबत झालं, तेच माझ्या बाबतीतही घडलं असतं” असं या महिलेने सांगितलं.

नाशिक ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

या महिलेच्या कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. विषय सार्वजनिक झाल्यामुळे आता त्यांना तिच्या सुरक्षेची चिंता आहे. TCS च्या या महिला कर्मचाऱ्याने सर्व महिलांना एकत्रित होऊन ऑफिसमधली ही जी काळी बाजू आहे, त्या विरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. हा वाद आणि तपास यामुळे नाशिक ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सांगितलं आहे.

Follow Us