AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण, ब्रेनवॉश आणि धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिला एचआरसह 6 जणांना अटक करण्यात आली असून, हिंदू मुलींना टार्गेट करून फसवणुकीचे षडयंत्र रचल्याचे उघड झाले आहे. विशिष्ट धर्मातील कर्मचाऱ्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे योजना आखत तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा गैरफायदा घेतल्याचे एसआयटी तपासात निष्पन्न झाले आहे.

Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि...तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र,  वाचून तुम्हीही हादराल
नाशिक धर्मांतरण प्रकरण
| Updated on: Apr 10, 2026 | 2:43 PM
Share

आधी भोंदू खरात प्रकरण, मग कथित नराधम पत्रकार रवींद्र एरंडे केस आणि आता नामवंत आयटी कंपनीच तरूणींचं, महिलांचं झालेलं लैंगिक शोषण व धर्मांतर… गेल्या काही दिवसांपासून नाशिक या घटनांमुळे चर्चेत आहे. एका आयटी कंपनीत घडलेल्या धर्मांतराचा प्रयत्न, तेथील तरूणींचं झालेलं लैंगिक शोषण, त्यांचं केलेले ब्रेनवॉश हे सगळंच हादरवणारं आहे. कंपनीतील 6 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यामध्ये महिला एचआरचाही समावेश आहे. या कंपनीत हिंदू मुलींना टार्गेट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्यांना फसवण्यासाठी कसं षडयंत्र रचलं जायचं त्याचेही हादरवणारे डिटेल्स उघड झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यातून आणखी बरेच धक्कादायक खुलासे होऊ शकतात.

या कंपनीतील विशिष्ट धर्माच्या तरुण-तरुणींनी संगनमत करून, इतर धर्मातील तरुणींना टार्गेट करण्यांचं षडयंत्र रचलं, त्यासठी त्यांनी काही गुप्त Whatsapp ग्रुप बनवले होते, अशीही माहिती एसआयटी (SIT) तपासात उघड झाली आहे. त्यातील एकेक डिटेल्स वाचून कोणाचंही डोकं चक्रावेल.

सभ्य वर्तनाने 20-22 वयोगटातील तरुणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न

नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिलांचे अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नामांकित कंपनीत विशिष्ट समुदायातील तरुण-तरुणींचा एक Whatsapp ग्रुप होता. त्यातून ते कोणत्या तरूणीला टार्गेट करायचं, जाळ्यात ओढायचं ते ग्रुपवर ठरवत असंत, त्यानुसार प्लान आखत असंत. मिळालेल्या माहितीनुसार, जे संशयित आरोप आहेत ते ऑफसीमध्ये अतिशय सभ्यपणे वागायचे आणि 20 ते 22 वयोगटातील काही तरूणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करून त्यांना जाळ्यात ओढायला बघायचे.

अशी होती मोडस ऑपरंडी

हे आरोपी त्या तरूणींशी खूप गोड बोलायचे, कौतुक करायचे, जेवणाच्या बहाण्याने बाहेर न्यायचे. त्यांना काही मदत करून मग ते त्यांच्याशी जवळीक साधायचे. तसेच कंपनीच्या मीटिंग कॉलमध्ये जर कामावरून काही प्रेशर असेल तर हे आरोपी दुसऱ्या Whatsapp ग्रुप मधून त्या तरुणी आणि महिलांना मदत करून विश्वास संपादन करण्याचा प्लान रचायचे. जर कोणाच टार्गेट पूर्ण झालं नाही तर ते त्या मुलींना अज्ञातस्थळी किंवा काही फ्लॅटमध्ये बोलावायचे आणि त्यांच्याशी गैरवर्तन करत होते , असं उघड झालं आहे. या आरोपींमध्ये फक्त तरूणांचा नव्हे तर मुलींचाही समावेश होता.

संशयित आरोपी या सगळ्या गोष्टी अगदी ठरवून करत होते, धार्मिक कट्टरवादी विचार करून एका विशिष्ट प्लानुसार धर्मांतराचा तगादा पीडित तरुणींसमोर लावत होते, असेही उघड झालं आहे. कंपनीतील तरुणांना अडकवण्यासाठी विशिष्ट धर्मातील Whatsapp ग्रुप मधून सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. या कथित धर्मांतरणाविरोधात नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये केवळ धर्मांतरच नव्हे तर जबरदस्तीने छेडछाड केल्याचे गंभीर आरोपही आहेत.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक