स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये रोजगार मेळावा; कधीपासून आयोजन, कसे व्हाल सहभागी?

रोजगार मेळाव्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांनाच सहभागी होता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँण्ड्रॉइड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी. मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये रोजगार मेळावा; कधीपासून आयोजन, कसे व्हाल सहभागी?
job alertImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 7:05 AM

नाशिकः बेरोजगार तरुणांची एक आनंदाची बातमी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त नाशिकच्या (Nashik) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 21 ते 25 फेब्रुवारी 2022 काळात ऑनलाइन (Online) पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (Employment fair) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे. या मेळाव्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांनाच सहभागी होता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँण्ड्रॉइड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर लॉगीनद्वारे उमेदवार पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

मुलाखती कशा घेतल्या जाणार?

उमेदवारांनी सादर केलेल्या पदानुसार आवश्यक कागदपत्रे व निकष पूर्ण करीत असल्यास त्या उमेदवारांची निवड नियुक्ती धारकांकडून केली जाणार आहे. त्यासाठी मोबाइल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे स्काइप, व्हॉट्सअॅप आदी माध्यमांद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. कोरोना कालावधीत स्थलांतरामुळे काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याने, कोविड-19 बाबत शासनाने निर्धारित केलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून कंपन्या, औद्योगिक आस्थापना, व्यवसाय, उद्योग हे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. याकरिता कंपन्या आणि उमेदवारांची सोय म्हणून ऑनलाइन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करून एकाच छताखाली सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी सांगितले आहे.

माहितीसाठी कुठे साधाल संपर्क?

भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फायर ऑप्शन वर क्लिक करून नाशिक ऑनलाइन जॉब फायर – 9 (2021-22) यावर जनरल, ईपीपी, ॲप्रटिंस आदी रिक्तपदे अधिसूचित करावी. तसेच सदर मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी विभागावरील वेबपोर्टलवर विनामूल्य करावी. नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 0253-2972121 कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर आणि nashikrojgar@gmail.com ई-मेल वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी मोठ्याप्रमाणवर सहभाग घेवून लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.