AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा तांडव सुरुच, नाशिकमध्ये 3 महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनामुळे एका तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. एका आठवड्यापासून खाजगी रुग्णालयात बाळावर उपचार सुरू होते.

कोरोनाचा तांडव सुरुच, नाशिकमध्ये 3 महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू
| Edited By: | Updated on: Dec 23, 2020 | 1:06 PM
Share

नाशिक : कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही याचं एक धक्कादायक उदाहरम समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे एका तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. एका आठवड्यापासून खाजगी रुग्णालयात बाळावर उपचार सुरू होते. पण अखेर आज चिमुकल्याची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून परिसरामध्ये कोरोनाची भीती आणखी वाढली आहे. (a 3 months child died in nashik because of corona)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत चिमुकल्याला इतरही आजार होते. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याने गेल्या आठवड्याभरापासून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर रात्रीच्या सुमारास त्याचं दु:खद निधन झालं. या घटनेमुळे चिमुकल्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण नाशिकमध्ये शोककळा पसरली आहे.

खरंतर, कोरोनाचा धोका कमी झाला आणि रुग्ण संख्याही कमी झाली असं समजून अनेकजण नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. पण या घटनेमुळे या जीवघेण्या संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचं समोर आलं होतं. पण गेल्या आठवड्याभरात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे.

कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाचीही धाकधूक वाढली आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे कोरोनाचा नवा जीवघेणा प्रकार समोर आल्याने नाशिक पालिकेने आजपासून नाईट कर्फ्यू सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं प्रमाण आणखी वाढलं आहे. (a 3 months child died in nashik because of corona)

इतर बातम्या –

भारतीयांसाठी Good News, ब्रिटीश निर्मित कोरोना लसीला भारतात पहिल्यांदा मिळणार मंजुरी

New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर

(a 3 months child died in nashik because of corona)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...