Ashok kharat: खरातने सर्वच लुटले, व्हिडिओ व्हायरल, पीडित महिलांचं जीणं मुश्कील, आता केले काय? सर्वच हादरले

Ashok Kharat Victims: भोंदू अशोक खरातमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यांचे सर्वस्व खरातने लुटले. तर त्यांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातील काहींची ओळख समोर आल्याने आता या महिलांना मोठा शॉक बसला आहे. या महिलांचं जीणं मुश्कील झालं आहे.

Ashok kharat: खरातने सर्वच लुटले, व्हिडिओ व्हायरल, पीडित महिलांचं जीणं मुश्कील, आता केले काय? सर्वच हादरले
Ashok Kharat Victims
| Edited By: | Updated on: Apr 05, 2026 | 11:20 AM

Ashok Kharat Victims: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्यामुळे अनेक महिलांचे जीणं मुश्कील झाले आहे. अगोदर या खरातने त्यांचे सर्वस्व लुटले. त्यांचे लैंगिक शोषण केले. भीती घालून त्यांना लुटले. त्या महिलांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांची ओळखही समोर आली. या सर्व घटनेमुळे महिलांना मोठा शॉक बसला. या महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या महिला नैराश्यात गेल्या आहेत. त्यातील काहींना या सर्व प्रकरणातून बाहेर पडण्यास अनेक दिवस जातील असे समोर येत आहे.

महिलांची थेट मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव

भोंदू अशोक खरात च्या जाळ्यात अडकलेल्या पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. खरात प्रकरणातील आठ ते नऊ पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. आता या महिलांना धार्मिक कर्मकांडाची आणि बुवाबाजीची प्रचिती आली आहे. त्यांनी आता त्याच मार्गाने न जाता, दुसरा मार्ग निवडला आहे. त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेतली आहे. त्या या सर्व मानसिक धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आता समाजात फिरतानाही मोठ्या अडचणी येत असल्याने या अडचणीतून बाहेर येण्यासाठी त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली आहे.

पोलिसांची मोठी भूमिका

खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने घरातच एकटे राहत आहेत. या प्रकरणातील अनेक महिला नैराश्याच्या सावटात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात वावरावे कसे, आपले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, या भावनेने त्यांना ग्रासले आहेत. तर विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण घेऊ नये तसेच पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही देत न्याय मिळवून देण्याच आवाहन केले आहे.

पीडित महिलांची विशेष पथकाकडून अज्ञातस्थळी चौकशी तसेच या प्रकरणात होणारा मानसिक त्रास बघता न्यायाच्या दृष्टीने प्रकरण हाताळावे असा सल्ला देण्यात आला आहे. भोंदू अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांकडे धाव घेतल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. भोंदू अशोक खरात आणि पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करत सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर नजर ठेवली जात आहे. तर याप्रकरणात व्हिडिओ व्हायरल न करण्याचे, ते पुढे न पाठवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. जर असे कोणी केले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Follow Us