AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून काही महिला मोठं कुंकू अन् मंगळसूत्र घालतात, काँग्रेसच्या माजी आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ

Rahul Bondre Offensive Statement: सध्या पक्ष प्रवेश थंडावले आहेत. तरी काही नेत्यांना ओढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी फिल्डिंग लावल्याचे दिसून येते. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काही नेते गळाला लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या माजी आमदारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

...म्हणून काही महिला मोठं कुंकू अन् मंगळसूत्र घालतात, काँग्रेसच्या माजी आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ
राहुल बोंद्रे Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Apr 05, 2026 | 10:34 AM
Share

Rahul Bondre Offensive Statement: आता निवडणुका नसल्याने विविध पक्षातील पक्ष प्रवेशांनाही जणू ब्रेक लागला आहे. पण दिल्लीपासून ते गल्लीपासून काही नेत्यांना गळ्याला लावण्याची जोरदार तयारी सुरू आहे. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी असे शब्दप्रयोग राजकारणात धडकी भरवत आहेत. त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातील माजी आमदार राहुल बोंद्रे यांची शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भेट घेतली. या भेटीवरून चर्चा रंगत असतानाच राहुल बोंद्रे यांनी वाद अंगावर ओढावून घेतला. काँग्रेस सोडून शिवसेनेत जाणार का असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांची भेट घेतली. त्यानंतर बोंद्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार का असा सवाल विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी विचित्र उदाहरणं दिले. जी कुणी महिला असते. जीला दाखवावं लागतं की, मी पतिव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते, असे अजब उत्तर त्यांनी या पक्ष बदलाच्या प्रश्नावर दिले. बोंद्रे यांचं उदाहरण तर चुकलंच पण त्यांची जीभही घसरली. त्यातून दुसराच अर्थ ध्वनीत होऊ लागला.

भाजपवर जोरदार टीका

काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी यावेळी भाजपवरही जोरदार टीका केली. भाजपवाल्यांची देशभरात अशीच पॉलिसी आहे. ज्यांना पक्षात आणायचे आहे, त्यांच्याविषयी चर्चा करत राहायची. कार्यकर्त्यांवर दबाव वाढवायचा. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा. ते एक सुनियोजीत चाल खेळतात. त्यानुसार ते चर्चा करतात. मी एकदाच सांगितले आहे. मला परत परत सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. जी कोणी महिला असते. तिला दाखवावं लागतं ती किती पतीव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते. मोठं मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते, असे उदाहरण राहुल बोंद्रे यांनी दिले. बोंद्रे यांच्या वक्तव्याने आता खळबळ उडाली आहे.

महिलांचे जोडो मारो आंदोलन

राहुल बोंद्रे यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर महिलांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. बोंद्रे यांच्या बॅनरला चिखलीतील शिवाजी चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांना त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. त्यांनी बोंद्रेंच्या बॅनरला जोडे मारले आणि विरोधात घोषणा दिल्या.

Follow Us
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?
ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?; ऑपरेशन टायगर पुन्हा...
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली