AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Tatkare: VSR कंपनीच्या मालकाला बेड्या ठोका, जय पवारांच्या मागणीबाबत प्रश्न विचारताच सुनील तटकरेंची रिॲक्शन काय?

Sunil Tatkare on Ajit Pawar Plane Crash: व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अटक व्हावी अशी मागणी काल जय पवार यांनी केली होती. उद्या बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यात येणार आहे. या सर्व घाडमोडींवर आज सकाळीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Sunil Tatkare: VSR कंपनीच्या मालकाला बेड्या ठोका, जय पवारांच्या मागणीबाबत प्रश्न विचारताच सुनील तटकरेंची रिॲक्शन काय?
सुनील तटकरे, अजित पवार, जय पवार, बारामती पोटनिवडणूकImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 05, 2026 | 9:51 AM
Share

Sunil Tatkare on Jai Pawar VSR Company: व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अटक व्हावी अशी मागणी काल जय पवारांनी बारामती येथील सभेत केला होती. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यात येणार आहे. या सर्व घडामोडींवर आज सकाळीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जय पवार यांनी राष्ट्रवादी विलनीकरणासंदर्भातही मोठे विधान केले होते. त्यावरही सुनील तटकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. उद्या सुनेत्रा पवार यांचे नामनिर्देशनपत्र भरण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन त्यांनी पक्षातील नेत्यांना केले आहे. त्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा सुरू आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही उद्या नामनिर्देशन भरताना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी

काल जय पवार यांनी सभेदरम्यान व्हीएसआर कंपनीचा मालक विजय कुमार सिंग (V.K.Singh) याला अटक करण्याची मोठी मागणी केली. त्यावर आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारणा करण्यात आली. जय पवार यांची जी मागणी आहे, तीच राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. तपास शीघ्र गतीने व्हावा. ज्या ज्या शंका तपासाच्या बाबतीत उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्याचाही समावेश तपासात करावा. तर अनेक लोकप्रतिनिधींनी या अपघाताविषयी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यासह तपास पूर्ण करण्यात यावा. लवकरात लवकर अंतिम अहवाल यावा. हा अहवाल देशाच्या आणि राज्याच्या जनतेसमोर यावा, अशी मागणी त्यांनी केली. तर संसदेत जेव्हा जेव्हा जातो, तेव्हा दादांच्या निधनाची हळहळ अनेक जण व्यक्त करतात. देशभरातील खासदार याविषयीची हळहळ व्यक्त करतात, असे तटकरे म्हणाले.

प्रत्येक प्रकरणात राष्ट्रवादीचेच नेत्यांची नावं का?

सध्या राज्यातील प्रत्येक प्रकरणात राष्ट्रवादीच्याच नेत्यांची नावं पुढं का येतात, असा प्रश्न जय पवार यांनी विचारला होता. तसेच राष्ट्रवादीलाच का टार्गेट करण्यात येत आहे. त्याबाबत सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, जय पवार हे एक तरुण नेते आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना प्रकट करणं हे योग्य आहे. त्या ज्या भावना पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी, पक्षाच्या संघटनेसाठी अत्यंत योग्य आहे असे उत्तर तटकरे यांनी दिले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल