AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, काय झाली चर्चा, नवीन राजकीय धक्का?

Sunetra Pawar Phone Call to Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोड घडत आहे. राज्यात बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने उमेदवार देण्याची घोषणा करत बिनविरोध निवडणुकीला धक्का दिला आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या धामधुमीत उद्धव ठाकरेंना फोन केला आहे.

Sunetra Pawar: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, काय झाली चर्चा, नवीन राजकीय धक्का?
सुनेत्रा पवार, उद्धव ठाकरेImage Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 10:35 AM
Share

Sunetra Pawar Phone Call to Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोड घडत आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आता टप्प्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया आलेली नाही. महाविकास आघाडी काँग्रेससोबत असणार की नाही हे समोर आलेले नाही. त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे  यांना फोन केला आहे.

पाठिंबा देण्यासाठी फोन

दिवंगत अजितदादा यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार यांनी अगोदर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता आमदारकीसाठी त्या बारामतीची पोटनिवडणूक लढवतील. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष बारामती पोटनिवडणुकीत उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे. तर त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठीही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे काँग्रेससोबत याविषयावर चर्चा करतील का याची उत्सुकता ताणली गेली आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी अजून काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

बारामतीसाठी दिल्लीहून हिरवा कंदिल

बारामती आणि राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्यासाठी दिल्लीहून हिरवा कंदिल मिळाल्याची माहिती आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी 6 इच्छुकांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. तर राहुरी मतदारसंघासाठी 4 उमेदवारांनी पक्षाकडे तिकीट मागितले आहे. या सर्वांच्या ऑनलाईन मुलाखती झाल्यात. आता काँग्रेस मित्रपक्ष उद्धव सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा करेल आणि निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादी जर निवडणूक लढणार नसेल तर काँग्रेस ही निवडणूक लढण्यास तयार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. काँग्रेसला राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडीसह इतरांनी या पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिल्याने लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Follow Us
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...