AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : विवाहित महिलांनी या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात, घर स्वर्ग बनेल

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : विवाहित महिलांनी या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात, घर स्वर्ग बनेल
chanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 10, 2026 | 10:12 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये पती-पत्नीचं नातं कसं असावं? संसार कसा करावा? पतीची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत?  याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नी हे संसार रूपी रथाची दोन चाकं असतात. दोन्ही चाकं जोपर्यंत समान गतीने धावतात, तोपर्यंत तो रथ हा व्यवस्थित धावतो, परंतु जर यापैकी एक चाक जरी मागे पडलं तरी संसार उद्धवस्त होतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य म्हणतात ज्याप्रमाणे पतीची काही कर्तव्य असतात, त्याचप्रमाणे पत्नीची देखील काही कर्तव्य असतात, विवाहित महिलांनी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आदर – चाणक्य म्हणतात विवाहित महिलेनं घरातील मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर करावा, त्यांना योग्य तो मान सन्मान द्यावा. कारण या व्यक्तींचा अनुभव तुमच्यापेक्षा खूप जास्त असतो. या व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे वडीलधाऱ्या माणसांचा योग्य तो आदर केला पाहिजे.

मुलांवर संस्कार – चाणक्य म्हणतात एक आई आपल्या मुलांवर जेवढे चांगले संस्कार करू शकते तेवढं इतर कोणीही त्या मुलांवर संस्कार करू शकत नाही. एक सशक्त पिढी घडवण्यामध्ये महिलांचा सर्वात मोठा वाटा असतो, त्यामुळे आपल्या मुलांवर संस्कार करण्याची मोठी जबाबदारी ही आईची असते.

बचत – चाणक्य म्हणतात कोणतीही महिला मुळातच काट कसरी स्वभावाची असते, परंतु पती जो पैसा कमावतो, त्यातील काही पैशांची महिलांनी बचत केली पाहिजे, हे पैसे तुमच्या वाईट काळात तुमच्या मदतीला येतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा