AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची आक्रमक भूमिका, म्हणाल्या, औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर नव्हे तर… असं करा

आम्ही काय करतोय, हे उर्फीसारख्या उर्फीट बाईला सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. जो ... नाच चाललाय तो महाराष्ट्राची संस्कृती नाही.

अजित पवार यांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची आक्रमक भूमिका, म्हणाल्या, औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर नव्हे तर... असं करा
चित्रा वाघ
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jan 02, 2023 | 4:09 PM
Share

नाशिक : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या, कुठलंही कारण नसताना वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये वातावरण करण्याचं काम केलंय. मागेसुद्धा राहुल गांधी यांची कुठंलीतरी रॅली आली. त्यांनीसुद्धा वि. दा. सावरकर यांचा अपमान केला. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माच्या संरक्षणासाठी बरचं काही भोगलं. तरीही संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत. असं अजित पवार यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यानं म्हणणं योग्य नाही. औरंगाबागचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करा म्हणून ठरलं. शिंदे-फडणवीस यांचं सरकार आहे. ते केंद्राकडं पाठपुरावा करतील. ते नामकरण होईलसुद्धा. आता माझी अशी मागणी आहे. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं करू नका. धर्मवीर संभाजीनगर करा.

अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानामुळं भाजपचे सर्व फ्रंट आज, उद्या आंदोलन करतील. महिला मोर्चा नाशिकच्या वतीनं आज अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं, अशी माहितीही चित्रा वाघ यांनी दिली.

काहीही बोलून आमच्यावर हल्ले करा. आम्ही काय करतोय, हे उर्फीसारख्या उर्फीट बाईला सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. जो … नाच चाललाय तो महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात संस्कृतीचा हा नाच दिसत नाही का, असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.

व्यक्तीस्वातंत्र्य हा स्वैराचार नाही. मुंबईच्या रस्त्यावर नाच करता. हे आम्ही खपवून घेणार नाही. पोलिसांत तक्रार केली आहे. त्याचा मी स्वतः पाठपुरावा करत असल्याचंही चित्रा वाघ यांनी सांगितलं. अशाप्रकारच्या उघड्यानागड्या मुली आम्हाला चालणार नाहीत, असंही त्यांनी सुनावलं.

Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?