AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा जीव तोळा तोळा…सोने 600 रुपयांनी स्वस्त…जाणून घ्या नाशिक सराफातील भाव

नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेमध्ये सोने स्वस्त झाले आहे. सोमवारी सोन्याच्या दरात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत 600 रुपयांची घसरण नोंदवली गेली.

असा जीव तोळा तोळा...सोने 600 रुपयांनी स्वस्त...जाणून घ्या नाशिक सराफातील भाव
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Sep 20, 2021 | 3:21 PM
Share

नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेमध्ये सोने स्वस्त झाले आहे. सोमवारी (20 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 46300 नोंदवले गेले. सोन्याच्या दरात चार दिवसांमध्ये 600 रुपयांची घसरण झाली आहे. (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,300 per 10 grams)

नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार नाही. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900, तर चांदीचे दर किलोमागे 63000 रुपये नोंदवले गेले. शुक्रवारी यामध्ये घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46400, तर चांदीचे दर किलोमागे 61700 रुपये नोंदवले गेले. गुरुवारच्या तुलनेत सोमवारी सोने ग्रॅममागे 600 रुपयांनी स्वस्त झाले होते. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 46300 गेले. गुरुवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण नोंदवली आहे, तर 22 कॅरेटच्या सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 45100 होते. सोन्याच्या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल. दुसरीकडे चांदीचे दर किलोमागे 62500 नोंदिवले गेले. हे दर शुक्रवारच्या तुलनेत चांदी 800 रुपयांनी महाग आहेत. दरम्यान, आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

जाणकार म्हणतात भाव वाढणार

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

घरबसल्या करा खरेदी

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचेदर 10 ग्रॅममागे 46300, तर चांदीचे दर किलोमागे 62500 रुपये नोंदवले गेले. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, नाशिक (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,300 per 10 grams)

इतर बातम्याः

नाशिकच्या मुक्त विद्यापीठाने टाकली कात; आता पदवी प्रमाणपत्रे ‘डिजिलॉकर’द्वारे मिळणार

नाशिकमध्ये पावसाची हजेरी; जाणून घ्या दोन दिवसांचा अंदाज

नाशिक पुन्हा गॅसवर; कोरोना रुग्णांत वाढ, हजाराचा टप्पा ओलांडला

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?