महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा भूकंप, काँग्रेस आमदाराचा काँग्रेसच्याच बड्या नेत्यावर गंभीर आरोप

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री के सी पाडवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "पाडवी यांनी आदिवासी मंत्री असताना कामे मंजूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतले. पण त्यांनी कामे केली नाहीत", असा आरोप हिरामण खोसकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा भूकंप, काँग्रेस आमदाराचा काँग्रेसच्याच बड्या नेत्यावर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Feb 19, 2024 | 8:28 PM

शैलेश पुरोहित, Tv9 प्रतिनिधी, नाशिक | 19 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्र काँग्रेसमधील एका बड्या नेत्याने भाजपात प्रवेश केल्याच्या घटनेला एक आठवडा होत नाही तेवढ्यात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री के सी पाडवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “पाडवी यांनी आदिवासी विकास मंत्री असताना कामे मंजूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतले होते. पण त्यानी काम मंजूर केल नाही. तसेच त्यांनी ते पैसेही परत केले नाहीत”, असा गंभीर आरोप हिरामण खोसकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात के सी पाडवी हे राज्याचे आदिवासी विकास मंत्री होते, यावेळी त्यांनी पैसे घेतले. पण काम केले नाही, असा आरोप काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी केलाय. दुसरीकडे पाडवी यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. “आमदार खोसकर यांनी केलेल्या वक्तव्याशी माझा काहीही संबंध नाही. ते पहिल्यांदा निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांना अनुभव नसल्यामुळे ते काय बोलत आहेत, याबाबत त्यांना देखील कळत नाहीय. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत”, असं स्पष्टीकरण के सी पाडवी यांनी दिलं आहे.

हिरामण खोसकर नेमकं काय म्हणाले?

“मतदारसंघात जी चर्चा चालू आहे की, खोसकर काँग्रेस सोडून भाजपत जाणार ते चुकीचं आहे. मी काँग्रेसमध्येच राहणार. कुठेही जाणार नाही. माझी मात्र एकच नाराजी आहे. तत्कालीन आघाडीतील आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी कॉन्ट्रॅक्टर, गरीब लोकांचे काम मंजूर करण्यासाठी पैसे घेतले होते. के सी पाडवी स्वतः फोन करून म्हणायचे की पैसे माझ्या OHDकडे पाठवून द्या. मी स्वतः माझदा हॉटेलमध्ये 1 कोटी 64 लाख रुपये के सी पाडवी यांना दिले. मी काम मंजूर करण्यासाठी पैसे दिले होते. मात्र काम मंजूर न झाल्याने कॉन्ट्रॅक्टर परत पैसे मागत आहेत. मी त्यांना आतापर्यंत अनेकदा बोललो. मात्र त्यांनी थोडेथोडे करून देतो असं सांगितलं”, असा दावा हिरामण खोसकर यांनी केला आहे.

’15 दिवसांपूर्वी माझ्याशी भांडण केलं’

“त्यांनी पैसे मागितल्याने 15 दिवसांपूर्वी माझ्याशी भांडण केलं. माझ्याकडे पैसे नाहीत. मी ते देऊ शकत नाही. मी याबद्दल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही माहिती दिली. के सी पाडवी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. ते माझ्या एकट्याचे पैसे नाहीत. माणिकराव कोकाटे यांचे चुलत भाऊ, माजी जिल्हाध्यक्ष यांचे पैसे आहेत”, असं हिरामण खोसकर यांनी सांगितलं.

‘नाशिक जिल्ह्यातून जवळपास 5 ते 10 कोटी रुपये दिले’

“नाशिक जिल्ह्यातून जवळपास 5 ते 10 कोटी रुपये दिलेले आहेत. पालघरवाल्यांचेही 65 लाख घेतले. त्याचेही 4 वेळा पैसे दिले नाहीत. शेवटी तो कोमात गेला. पक्षाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन कारवाई करावी किंवा पैसे परत द्यायला सांगावे. त्यांना पक्षातून काढून टाकावे. यामुळे पक्षाची बदनामी होते”, असं हिरामण खोसकर म्हणाले.

“मी छातीठोकपणे सांगतो मी कुठेही जाणार नाही. कुठेही असलो तरी मला मतदारसंघातील कामांसाठी मंत्र्यांच्या भेटी घ्याव्या लागतात”, असंदेखील स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.