Nitesh Rane: कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसाय करू देऊ नका, दिवाळीतही…; नितेश राणेंचं मोठं विधान, नव्या वादाला तोंड फुटणार?

Nitesh Rane News: नितेश राणेंचं नवं विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी कुंभमेळ्यातील व्यवसाय आणि दिवाळीच्या खरेदीबाबत एक वक्तव्य केले आहे.

Nitesh Rane: कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसाय करू देऊ नका, दिवाळीतही...; नितेश राणेंचं मोठं विधान, नव्या वादाला तोंड फुटणार?
| Updated on: Oct 24, 2026 | 7:24 PM

मंत्री नितेश राणे त्यांच्या आक्रमक राजकीय वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी नवी मुंबईत एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी नाशिक कुंभमेळा आणि दिवाळीची खरेदीवर एक विधान केले आहे. ते आता चर्चेत आले आहे. या वक्तव्यातून त्यांनी गैरहिंदूवर निशाणा साधला आहे. तसेच कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसायास मनाई करा, असं ते म्हणाले आहेत. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसायास मनाई करा. दिवाळीत हिंदूंकडूनच वस्तू खरेदी करा. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसाय करण्यास मनाई करावी, तसेच दिवाळीदरम्यान हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी कराव्यात, असं वक्तव्य राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. नवी मुंबईतील जुईनगर येथे अन्नपुरवठा करणाऱ्या ‘हर हर’ या संस्थेच्या कार्यक्रमात आयोजित संमेलनात ते बोलत होते.

Loading...

हिंदू समाजाविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही मोठी सभा असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. या मागण्या करण्यात गैर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कुंभमेळ्यातील व्यवसाय आणि दिवाळीच्या खरेदीबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक कुंभमेळ्याचे अधिकृत वेब पोर्टल ३१ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. हे पोर्टल नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणद्वारे विकसित केले जात आहे. कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळाही ३१ ऑक्टोबर रोजीच होणार आहे. यात्रेकरूंवर केंद्रित असलेली ही वेबसाइट अधिकृत घोषणा, स्नानाच्या महत्त्वाच्या तारखा व वेळा, प्रवासाची माहिती, आवश्यक सुविधांचा तपशील, सुरक्षा, सल्ला आणि सहाय्यक संसाधने यांसाठी एकच ठिकाण उपलब्ध करून देईल.

३१ ऑक्टोबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात त्यांची भेट घेऊन औपचारिक निमंत्रण सुपूर्द केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us