AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंकडून डुकराचा फोटो पोस्ट, म्हणतात पैहचान कौन?

या सर्वात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेली पोस्ट म्हणजे भाजप आमदार नितेश राणेंची (Nitesh Rane) पोस्ट. आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला. हे तर होणारच होतं. आता ईडीसमोर बोल नाहीतर हातात विडी देतील, असा टोला आधी राणेंनी लगावला. त्यानंतर नितेश राणे यांनीही एक सूचक पोस्ट केली आहे.

मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंकडून डुकराचा फोटो पोस्ट, म्हणतात पैहचान कौन?
नितेश राणे यांची फेसबूक पोस्ट
| Updated on: Feb 23, 2022 | 5:55 PM
Share

मुंबई : पाहटेपासून झालेल्या वादळी चौकशीनंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून (ED) अटक झाली. त्यावर राजकीय प्रतिक्रिया जोरात येणार हे सर्वांनाच माहीत होतं. मात्र यावरून ट्विटवॉरही सुरू झालं आहे. एकापाठोपाठ एक नेत्यांची ताबडतोड ट्विट येत आहेत. या सर्वात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेली पोस्ट म्हणजे भाजप आमदार नितेश राणेंची (Nitesh Rane) पोस्ट. आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला. हे तर होणारच होतं. आता ईडीसमोर बोल नाहीतर हातात विडी देतील, असा टोला आधी राणेंनी लगावला. त्यानंतर नितेश राणे यांनीही एक सूचक पोस्ट केली आहे. जीसोशल मीडियावर सध्या चांगलच व्हायरल होत आहे. आदित्य ठाकरे विधानसभेत जाताना म्याव म्यावच्या घोषणा दिल्यानंतर नवाब मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्विट केला होता. त्यावेळीच राणे विरुद्ध मलिक संघर्ष पेटला होता. आता मलिकांच्या अटकेनंतर पुन्हा हा संघर्ष धार घेतोय.

नितेश राणे यांची पोस्ट काय?

नितेश राणे यांनी पोस्ट करताना, जाळ्यात अडकलेल्या एका डुकराचा फोटो पोस्ट केला आहे. आणि पैहचान कौन? असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे या ट्विटवरून नवं राजकीय वादंग सुरू होण्याची शक्यता आहे. हे ट्विट सध्या व्हायरल होतं आहे. नेटकरी या ट्विटवर भरभरून व्यक्त होत आहेत. त्यामुळे यावर रिट्विटचा पाऊस पडला आहे. यावर आलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला पोट धरून हसवतली. एका युजरने लिहलं आहे की, महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ED कारवाही मध्ये अडकले..जय महाराष्ट्र..म्याँव म्याँव ? तर दुसऱ्याने लिहले आहे, डुक्कर आले जाळ्यात ? वाघाची तैयारी होत आहे का❓ ? नेट प्रॅक्टिस चालु आहे, ?? तर काहींनी विरोधात कमेंट करताना, याला वैचारिक दिवाळखोरी म्हणतात..ज्या पक्षाच्या वळचणीला गेलात त्यांनी अशाच प्रकारे हजारो वर्षांपासून समजा-समाजात तेढ निर्माण केली आहेत. तुम्ही हा व्हिडिओ टाकून स्वतः ची वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली, हेच यावरून सिद्ध होते. अशाही काही कमेंट आल्या आहेत. दोन्ही बाजुने यावर लोक व्यक्त होत आहेत. तर काहीनी कोंबडीचे फोटो उत्तर म्हणून पोस्ट केले आहेत.

‘नवाब बेनकाब हो गया’, आशिष शेलारांचा मलिकांना जोरदार टोला; नितेश राणेंसह अनेक भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर निशाणा

Nawab Malik Arrest : ईडीला सरकार बनवायची घाई लागली असेल तर शिवाजी पार्कात या! यशोमती ठाकूर यांचं थेट आव्हान

Exclusive | मलिकांची अरेस्ट ऑर्डर टीव्ही 9 मराठीच्या हाती! मनी लॉड्रिंग ऍक्ट 2002च्या अंतर्गत कारवाई

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.