मोठी बातमी! आता भाजपमधील इनकमिंग बंद, दुसऱ्या पक्षातील खासदारांना पक्षात नो एन्ट्री?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आता वाढले तर खासदार एनडीएचेच वाढतील, भाजपचे खासदार वाढणार नाहीत, कोणत्याही पक्षातील खासदारांना महाराष्ट्र भाजपात नो एन्ट्री असेल, असं विधान भाजपच्या बड्या नेत्यानं खासगीमध्ये केलं आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सध्या राज्यात ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार आहेत, आणि ते सर्वजण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आणखी एक अशी देखील चर्चा सुरू झाली होती की, हे सर्व खासदार थेट भाजपच्या संर्पकात आहेत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या बड्या नेत्यानं खासगीत बोलताना मोठं विधान केलं आहे. आता वाढले तर खासदार एनडीएचेच वाढतील, भाजपचे खासदार वाढणार नाहीत, कोणत्याही पक्षातील खासदारांना महाराष्ट्र भाजपात नो एन्ट्री असेल, असं खासदार फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका बड्या नेत्यानं खासगीमध्ये विधान केल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार असतील ते फुटणार आहेत, अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गट, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्याचसोबत अशी देखील एक चर्चा सुरू होती, की हे दोन्ही पक्षाचे खासदार थेट भाजपच्या संपर्कात आहेत. पण आता या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्यानं खासगीत मोठं विधान केलं आहे. आता खासदारांची संख्या वाढली तर ती एनडीएची वाढेल, भाजपच्या खासदारांची संख्या वाढणार नाही. भाजपच्या या नेत्याकडून खासदारांच्या भाजप प्रवेशाला फूल स्टॉप देण्यात आला आहे. याचाच अर्थ आता कुठलंही ऑपरेशन झालं ऑपरेशन तुतारी किंवा ऑपरेशन टायगर जरी झालं तरी देखील या खासदारांना भाजपमध्ये एन्ट्री मिळणार नाहीये.
दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील हे वृत्त फेटाळून लावलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर बोलताना असं काहीही होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.