उंची तीन फूट, शिक्षणात भरारी, झिरो नव्हे, हिरो जोडप्याचं लग्न

जळगाव : माणसाचं शरीर निसर्गाची देणं आहे. कुणी गोरा, तर कुणी काळा-सावळा असतो. एखादा भरदार शरीरयष्टीचा, कुणी जाड, तर कुणी बारीक, कुणी उंच तर कुणी ठेंगणा… अशा तीन फूट उंचीच्या वधू-वरांचा विवाहसोहळा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारा येथे पार पडला.   उंची कमी असली म्हणजे काही करता येत नाही असं नव्हे. उंचीने कमी असलेल्या तीन …

, उंची तीन फूट, शिक्षणात भरारी, झिरो नव्हे, हिरो जोडप्याचं लग्न

जळगाव : माणसाचं शरीर निसर्गाची देणं आहे. कुणी गोरा, तर कुणी काळा-सावळा असतो. एखादा भरदार शरीरयष्टीचा, कुणी जाड, तर कुणी बारीक, कुणी उंच तर कुणी ठेंगणा… अशा तीन फूट उंचीच्या वधू-वरांचा विवाहसोहळा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारा येथे पार पडला.

, उंची तीन फूट, शिक्षणात भरारी, झिरो नव्हे, हिरो जोडप्याचं लग्न

 

उंची कमी असली म्हणजे काही करता येत नाही असं नव्हे. उंचीने कमी असलेल्या तीन फुटाच्या या तरुणाचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. शिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केला. नंतर कौटुंबीक जीवन जगण्यासाठी तीन फुटाची उपवर मुलगी शोधायची कुठून हा प्रश्न समोर उभा होता आणि योगिताच्या रूपाने त्याला शोभेशी मुलगी मिळाली. मुलाचं लग्न होत असल्याचं समाधान वडिलांनी व्यक्त केलंय.

, उंची तीन फूट, शिक्षणात भरारी, झिरो नव्हे, हिरो जोडप्याचं लग्न

 

फक्त तीन फुटाची नवरी आणि तेवढीच उंची असलेला नवरदेव हा परिसरात कुतूहलाचा विषय आहे. लग्न सोहळा पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. तर डिजीटल वाद्यावर थिरकणारी तरुणाई सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.

, उंची तीन फूट, शिक्षणात भरारी, झिरो नव्हे, हिरो जोडप्याचं लग्न

असं म्हणतात की जोड्या या देवानेच बनवलेल्या असतात. तसंच काहीसं या जोडप्याच्या बाबतीत पाहायला मिळतंय. नवरदेव निलेश लुभानराव जगताप यांचं शिक्षण डिप्लोमा पॉलिटेक्निक झालं आहे. मुलगी योगिता देखील उच्चशिक्षित आहे. शरीराने उंची नसली तरी आजच्या प्रगत युगात शैक्षणिक उंची मात्र या वधू-वरांनी गाठली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *