Sangli Crime : सांगलीत खोट्या नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

| Updated on: Jun 09, 2022 | 1:26 AM

मिरजेतील कृष्णाघाट येथे महात्मा गांधी चौक पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एका गाडीची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये नोटांनी भरलेली बॅग आढळून आली. या बॅगेत 2 हजार, 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे समोर आले.

Sangli Crime : सांगलीत खोट्या नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगलीत खोट्या नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली : मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा (Fake Notes) घेऊन फसवणूक (Fraud) करणाऱ्यासाठी आलेल्या एका टोळीला मिरज पोलिसांनी जेरबंद (Arrest) केले आहे. 60 हजार रोख आणि मनोरंजन नोटासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक करण्यात आली आहे. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. उस्मान खुदबुद्दीन एकसंबेकर, नदीम नालबंद, आणि शब्बीर साहेब हुसेन पीरजादे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून रोख 60 हजार, चारचाकी गाडी आणि भारतीय बच्चे बँकेच्या नोटा असा साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाकाबंदी दरम्यान गाडी तपासताना बॅग आढळली

मिरजेतील कृष्णाघाट येथे महात्मा गांधी चौक पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एका गाडीची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये नोटांनी भरलेली बॅग आढळून आली. या बॅगेत 2 हजार, 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे समोर आले. मात्र नोटांची तपासणी करण्यात आली असता, प्रत्येक नोटांच्या वर आणि खाली खऱ्या नोटा आणि आतील बाजूस लहान मुलांच्या खेळण्यासाठी असणाऱ्या “भारतीय बच्चे बँक”च्या हुबेहूब खऱ्या नोटांप्रमाणे दिसणाऱ्या नोटा होत्या. ज्यामध्ये 500 रुपयांच्या 55 बंडल आणि 2 हजार व 100 रुपयांच्या 45 मनोरंजन नोटांच्या बंडलांचा समावेश होता. याप्रकरणी पोलिसांनी उस्मान खुदबुद्दीन एकसंबेकर, नदीम नालबंद, आणि शब्बीर साहेब हुसेन पीरजादे या तिघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीत खोट्या नोटा देऊन खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करण्यासाठी मिरजेत आल्याचे आरोपींनी सांगितले. (A gang was arrested in Sangli for cheating by giving fake notes)

हे सुद्धा वाचा