Igatpuri Crime : इगतपुरीत व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाणीत पीडित गंभीर जखमी

पोलीस सूत्रांनी माहिती दिल्यानुसार घोटी शहरातील वासुदेव चौकातील कालिका मंदिरासमोर रामरावनगर येथे आरीफ पानसरे हे पावभाजीच्या गाडीवर पावभाजी खात होते. यावेळी त्या ठिकाणी सिध्दार्थ भोर आला. सिद्धार्थने पानसरे यांच्याशी विनाकारण वाद घालायला सुरुवात केली. चिकनच्या दुकानाचा जास्त पैसा झाला असे म्हणून आरीफ पानसरे यांचा नविन मोबाईल जमिनीवर आपटून फोडून टाकला.

Igatpuri Crime : इगतपुरीत व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाणीत पीडित गंभीर जखमी
भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळली
Image Credit source: tv9
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 08, 2022 | 10:42 PM

इगतपुरी : किरकोळ कारणावरून एका चिकन व्यवसायिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे घडली आहे. या हाणामारीत सदर व्यवसायिक गंभीर जखमी (Injured) झाला आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरीफ मोहमद पानसरे (38) असे गंभीर जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. तर सिद्धार्थ पांडुरंग भोर (27) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात भादवि कलम 307, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहेत.

मारहाणीत व्यावसायिक गंभीर जखमी

पोलीस सूत्रांनी माहिती दिल्यानुसार घोटी शहरातील वासुदेव चौकातील कालिका मंदिरासमोर रामरावनगर येथे आरीफ पानसरे हे पावभाजीच्या गाडीवर पावभाजी खात होते. यावेळी त्या ठिकाणी सिध्दार्थ भोर आला. सिद्धार्थने पानसरे यांच्याशी विनाकारण वाद घालायला सुरुवात केली. चिकनच्या दुकानाचा जास्त पैसा झाला असे म्हणून आरीफ पानसरे यांचा नविन मोबाईल जमिनीवर आपटून फोडून टाकला. एवढ्यावरच न थांबता सिध्दार्थ भोर याने आरीफ पानसरे यांना लाथाबुक्याने मारहाण केली. सिद्धार्थने हातातील चाकूने पानसरेंच्या तोंडावर, पाठीवर व पोटात वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात आरीफ पानसरे गंभीर जखमी झाले. या हाणामारीत आरीफ पानसरे यांच्या खिशातील 20 हजार रुपये गहाळ झाले. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Attempt to kill businessman in Igatpuri, victim seriously injured in beating)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें