Video: पतंगराव कदमांचा एक पोरगा कशानं गेला माहितय का? बंडातात्या कराडकरांनी मर्यादा ओलांडली?

| Updated on: Feb 04, 2022 | 11:51 AM

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे दारू पितात... सुप्रिया सुळे दारू पिऊन रस्त्यावर पडल्याचे ढीगभर फोटो आहेत... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन, पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना वाईन विक्रीचा निर्णय घ्यायला लावला. ढवळ्याशेजारी पवळा बांधल्याने गुण लागणारच...

Video: पतंगराव कदमांचा एक पोरगा कशानं गेला माहितय का? बंडातात्या कराडकरांनी मर्यादा ओलांडली?
Bandatatya Karadkar
Follow us on

सातारा: भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे  (Supriya Sule and Pankaja Munde) दारू पितात… सुप्रिया सुळे दारू पिऊन रस्त्यावर पडल्याचे ढीगभर फोटो आहेत… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन, पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  (ajit pawar) त्यांना वाईन विक्रीचा निर्णय घ्यायला लावला. ढवळ्याशेजारी पवळा बांधल्याने गुण लागणारच… अशी एकापाठोपाठ एक बेताल विधानं केल्याने कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्याविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत आहे. हे कमी की काय बंडातात्यांनी आणखी मर्यादा ओलांडली. यावेळी त्यांनी थेट दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांना टार्गेट केलं. पतंगरावांचा मुलगा कशाने गेला माहीत आहे काय? दारुच्या नादात पतंगरावांचा मुलगा गेला, असं विधान बंडातात्यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

बंडातात्या कराडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही बेछूट विधाने केली. दारु पिऊन सुप्रिया ताई नाचते, पंकजा ताई नाचते या मतावर मी ठाम आहे देवा. पत्रकारांना अडवे प्रश्न विचारण्याची सवयच असते. पतंगरावांचा अभिजीत कदम कसा मेला? पतंगरावांचा एक मुलगा कसा मेला आठवतं का? झाडावर गेला होता ना? कसा गेला तो विचार की त्यांना मग. दारुच्या नादातनं कसा गेला होता?, असे सवाल करतानाच माझं तुम्हाला विचारणं आहे, कोणत्या पुढाऱ्याचा मुलगा दारु पित नाही ते आम्हाला सांगा. कराडचे बाळासाहेब आमदार. त्यांचा मुलगा दारु पितो की नाही? मी सांगतो ना तुम्हाला. प्रत्येकाची नावं सांगू का? सर्वांची नावं जगजाहीर आहेत, असा दावाही बंडातात्यांनी केला.

आमचं चॅलेंज स्वीकारावं

ते दारु पितात हे सिद्ध करून दाखवू. त्यांनी चॅलेंज स्वीकारावं आमचं. जरूर. कुणीबी चॅलेंज स्वीकारावं. अहो, कशाला पुरावे सादर करायचे. राजकारणात येण्याआधी सुप्रियाताई दारू पिऊन रस्त्यावर पडल्याचे ढिगानं फोटो मिळतील. बंडातात्या खोटं बोलतोय हे सुप्रियाताईंनी सांगावं ना सरळ. तुम्हाला माहीत नाही व्हयं, असंही ते म्हणाले.

अभिजीत यांचा अपघाती मृत्यू

दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव अभिजीत कदम यांचा 2004मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे त्यांच्या मर्सिडीज बेन्जने एका कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अभिजीत यांचा मृत्यू झाला होता.

आधी तमाशानंतर माफी

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर बंडातात्या कराडकर यांनी आज अखेर माफी मागितली आहे. संपूर्ण राज्यात त्यांच्या विधानाचे पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. त्यानंतर बंडातात्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. त्यामुळे बंडातात्यांनी माफी मागितली आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दोघीही मला मुलीसारख्या आहेत. बापाच्या नात्याने मी त्यांची माफी मागत आहे. त्यांनी आपल्या समर्थकांनाही समजावं असं बंडातात्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Bandatatya Karadkar: कुणाबद्दल आकस नाही, द्वेष नाही, अनावधानाने बोललो, सर्वांची माफी मागतो; बंडातात्या कराडकरांची जाहीर दिलगीरी

VIDEO: अजितदादानं गुण लावला दारू विकण्याचा, बंडातात्या कराडकरांच्या टार्गेटवर नेत्यांचे पोरंबाळही

Rupali Patil | बंडातात्या दारु पिऊन बोलले, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचं त्याच भाषेत उत्तर, आणखी काय बोलल्या?