आधी भाऊ नंतर बहिणीचा मृत्यू, मण्यार सापाने घेतला दोघांचाही जीव, सांगलीतील आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर

| Updated on: Oct 16, 2021 | 11:31 PM

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील आळसंद येथे एक अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. मण्यार जातीच्या सापाने दंश केल्यानंतर भावानंतर बहिणीचाही मृत्यू झाला आहे. या घटनेत सापाने दंश केल्यानंतर भावाचा लगेचच अंत झाला होता.

आधी भाऊ नंतर बहिणीचा मृत्यू, मण्यार सापाने घेतला दोघांचाही जीव, सांगलीतील आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
SANGLI BROTHER AND SISTER DEATH
Follow us on

सांगली : सांगलीच्या खानापूर तालुक्यातील आळसंद येथे एक अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. मण्यार जातीच्या सापाने दंश केल्यानंतर भावानंतर बहिणीचाही मृत्यू झाला आहे. या घटनेत सापाने दंश केल्यानंतर भावाचा लगेचच अंत झाला होता. तर आठ दिवसापासून उपचार घेणाऱ्या बहिणीचाही मृत्यू झाला. या दोघा बहीण-भावाच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विराज सुनिल कदम आणि सायली जाधव अशी मृत्यूमुखी पडलेल्या बहिण-भावांची नावे आहेत.

सापाने दंश केला, भावाचा मृत्यू, बहिणीचाही घेतला चावा

मिळालेल्या माहितीनुसार विराज याला 6 ऑक्टोबर रोजी घरी झोपेत असताना मण्यार या अतिविषारी सापाने दंश केला होता. यात सकाळपर्यंत त्याला काय झाले हे कुटुंबाला न समजल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेतानाच त्याचा मृत्यू झाला. विराजच्या रक्षाविसर्जन विधीसाठी त्याची विवाहित बहिण सायली जाधव या माहेरी आल्या होत्या. विराज याच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवारी होता. गुरूवारी रात्री सर्वजण झोपलेले असताना घरात लपून बसलेल्या त्याच मण्यार सापाने सायली यांनाही दंश केला. तत्काळ सायली जाधव यांना विटा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. परंतू गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेणाऱ्या सायली यांचीही प्रकृती दोन दिवसात बिघडली. अखेर शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान सायली यांचाही मृत्यू झाला.

एक वर्षाची मुलगी पोरकी

सायली जाधव यांना एक वर्षांची मुलगी आहे. आईला सर्पदंश झाल्यापासून ती आईपासून वेगळी आहे. आईला भेटण्यासाठी ती आतूर झाली असून दररोज हंबरडा फोडत आहे. यामध्ये कुटुंबाची मोठी तारांबळ उडत आहे. अखेर आठ दिवसानंतरसुद्धा तिची ही इच्छा अपुरीच राहिली असून ती आता आईविना पोरकी झाली आहे.

दोन्ही आपत्यांचा मृत्यू झाल्यामुळे आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर

तर मयत मुलांचे वडील सुनिल कदम हे शेतकरी असून टेलरिंगचा व्यवसाय करत होते. त्यांना विराज हा एकुलता एक मुलगा व दोन मुली होत्या. यात त्यांचा मुलगा व मुलगी गेल्याने कुटुंबावर मोठा दुख:चा डोंगर कोसळला आहे. सापाच्या हल्ल्यात या कुटुंबाचा आधारच संपल्याने शासनाने याचा विचार करुन कुटुंबाला ठोस मदत देणे गरजेचे असल्याची मागणी केली जात आहे.

इतर बातम्या :

चालत्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली आणि महिला डॉक्टरने जीव गमावला, नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री?

कल्याण शीळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कारचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी, गाडीचा चुराडा

श्रीरामांच्या विरहात दशरथ राजाने मंचावर प्राण सोडला, ‘रामलीला’त चटका लावून जाणारी खरी एक्झिट, सहकलाकार-प्रेक्षकांचा आक्रोश

(brother and sister died by snake bite in sangli district)