कोळ्यांच्या जाळ्यात 6 फुटी अजगर अडकला, व्हिडीओ पाहून व्हाल शॉक!

मालाडमधील पाम बिच रिसॉर्टमध्ये नुकतीच एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. मालाडमधील बिच रिसॉर्टच्यामागे कोळ्यांच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात 8 फुटी अजगर अढळल्याने नागरिकांच्यात एकाच खळबळ उडाली. हा अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यात सुटण्याचा खूप प्रयत्न करात होता.

कोळ्यांच्या जाळ्यात 6 फुटी अजगर अडकला, व्हिडीओ पाहून व्हाल शॉक!
snake 2


मुंबई : मालाडमधील पाम बिच रिसॉर्टमध्ये नुकतीच एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. मालाडमधील बिच रिसॉर्टच्यामागे कोळ्यांच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात 6 फुटी अजगर अढळल्याने नागरिकांच्यात एकाच खळबळ उडाली. हा अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यात सुटण्याचा खूप प्रयत्न करात होता. 10 ते 12 किलोच्या अजगराची लांबी आणि ताकद पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना गोराईमधील शेफाली चौकाजवळ घडली.

अजगर अडकल्याची माहिती Sarp Foundation या गोराईतील सेवाभावी संस्थेला मिळाली. ही संस्था बऱ्याच वर्षापासून मुंबई परिसरातून साप व इतर पशू पक्षी वाचवण्याचे काम करीत आहेत. या संस्थेतील जयवंत दुखंडे यांना त्याचे सहकारी दिनेश मोरे आणि विराज यांना या अजगराबद्दल माहिती दिली. या सर्प मित्रांनी आणि गोराई पोलिसांनी वेळेत जागेवर पोहचून त्या भल्यामोठ्या 8 फुटी अजगराला कोळ्यांच्या नायलॉनच्या जाळ्याला कापून सुरक्षित सोडवले. जर अजगराला वेळीच सोडवले नसते तर सुटण्याच्या प्रयत्नात नायलॉनच्या धाग्याने त्याला खोलवर जखमा झाल्या असत्या.

इथे पाहा व्हिडीओ

या अजगराला ताब्यात घेतल्यानंतर ठाणे वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली, तसेच त्यांच्या सूचनेनुसार अजगराची प्राण्यांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून तो पुन्हा त्याचे नैसर्गिक आवसात सोडण्यास फिट असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आलं. तसंच अजगराला लवकरच मुक्त केले जाणार आहे.

इतर बातम्या :

मुंबईसह महाराष्ट्राच्या डोक्यावर वीज संकट, महावितरण म्हणतं, सकाळ-संध्याकाळ वीज वापर कमी करा, वाचा सद्यस्थिती!

दिल्लीनंतर महाराष्ट्रात विजेचे संकट गडद, कोळशाअभावी 13 युनिट बंद

नव्या नवरीची दीरासोबत मस्ती, मस्करीत छडीने मारलं, उपस्थितही हसून लोटपोट, Viral Video पाहाच

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI