Pune | सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह; बांधकामाच्या गुणवत्तेबाबत सनी निम्हण यांचा आरोप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. मात्र या पुलाच्या बांधकामावर भाजपचे नगरसेवक सनी निम्हण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. मात्र या पुलाच्या बांधकामावर भाजपचे नगरसेवक सनी निम्हण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुलाच्या बांधकामाचा फोटो सोशल मीडियावर ट्विट करत त्यांनी या प्रकल्पाबाबत शंका व्यक्त केली. तसेच या पुलाला स्वर्गीय अजित पवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नसल्याचा दावा सनी निम्हण यांनी केला आहे. दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून सनी निम्हण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना काय उत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Mar 10, 2026 11:15 AM
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला

