AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG पुरवठा झाला नाही तर पुढील 2 दिवसांत मुंबईत…सरकारने तातडीने घेतला मोठा निर्णय

रविवारपासूनच व्यावसायिक एलपीजी पुरवठा मोठ्या प्रमाणात थांबल्याचं रेस्टॉरंट मालकांचं म्हणणं आहे. तर घरगुती सिलेंडर बुकिंगनंतर दोन ते आठ दिवसांपर्यंत डिलिव्हरीला विलंब होत आहे.

LPG पुरवठा झाला नाही तर पुढील 2 दिवसांत मुंबईत...सरकारने तातडीने घेतला मोठा निर्णय
LPG CylinderImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 10, 2026 | 12:13 PM
Share

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या अचानक आलेल्या संकटामुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जर पुरवठा पूर्ववत झाला नाही तर काही दिवसांतच रेस्टॉरंट बंद पडू शकतात, असा इशारा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील रेस्टॉरंट संघटनांनी दिला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तीव्र संघर्षाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. मुंबई आणि बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर आधीच परिणाम झाला आहे.

इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी याविषयी म्हणाले, “ही टंचाई वेगाने पसरतेय. जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढील दोन दिवसांत मुंबईतील सर्व रेस्टॉरंट बंद होतील. असोसिएशनने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र लिहिलं असून आम्ही महाराष्ट्र नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याही संपर्कात आहोत. आतापर्यंत आमच्या 10 ते 20 टक्के सदस्यांना समस्या येत आहेत. उद्यापर्यंत ते 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल आणि परवापर्यंत रेस्टॉरंट्सवर 100 टक्के परिणाम होईल, ज्यामुळे त्यांना टाळं लावण्याची वेळ येईल.”

रेस्टॉरंट मालकांच्या मते रविवारीपासूनच व्यावसायिक एलपीजी पुरवठा मोठ्या प्रमाणात थांबला आहे. तर घरगुती सिलेंडर बुकिंगनंतर दोन ते आठ दिवसांपर्यंत डिलिव्हरीला विलंब होत आहे. “आम्हाला व्यावसायिक एलपीजी सिलेंडर मिळत नाहीयेत. काही ठिकाणी ते उपलब्ध असले तरी 1750 रुपयांचा सिलेंडर 1950 रुपयांना विकला जात आहे”, अशी तक्रार मुलुंडमधील हॉटेल मालक अन्नू शेट्टी यांनी केली. कर्नाटकमधअयेही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यावसायिक एलपीजी पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे 10 मार्चपासून हॉटेलच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती बेंगळुरू हॉटेल्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.

सरकारने तेल विपणन कंपन्या, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांना घरगुती स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. तर साठेबाजी रोखण्यासाठी घरगुती एलपीजी सिलेंडर नोंदणीसाठी किमान प्रतीक्षा कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच एलपीजी पुरवठा स्थिर करण्यासाठी भारत अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि नॉर्वे यांच्याशिवाय नवीन आंतरराष्ट्रीय पुरवठादारांचा शोध घेत आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ट्विट करत स्पष्ट केलंय, ‘एलपीजी पुरवठा स्थिर करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचं आणि अतिरिक्त उत्पादन घरगुती वापरासाठी वळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सध्या रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या आवश्यक क्षेत्रांसाठी आयात केलेल्या एलपीजीच्या वापरासाठी प्राधान्य दिलं जात आहे.’

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...