कल्याण शीळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कारचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी, गाडीचा चुराडा

कल्याण शीळ रस्त्याचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आज (16 ऑक्टोबर) एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.

कल्याण शीळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कारचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी, गाडीचा चुराडा
कल्याण शीळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कारचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी, गाडीचा चुराडा

कल्याण (ठाणे) : कल्याण शीळ रस्त्याचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आज (16 ऑक्टोबर) एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडी दूरवर फेकली गेली आहे. गाडीचा चालक सुदैवाने बचावला असला तरी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीचा चुराडा झाला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. या नव्या भीषण अपघाताच्या घटनेमुळे रस्त्याच्या अर्धवट कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

गाडी चालक आकाश पाटील हा आज पहाटे शीळहून कल्याणच्या दिशेने जात होता. या दरम्यान पांडुरंगवाडी नजीक रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याठिकाणी कंत्रटदाराने एक लोखंडी डिव्हायडर पत्रा लावला आहे. हा लोखंडी पत्रा लक्षात न आल्याने पाटील यांची गाडी त्याला जोराने धडकून रस्त्याच्या गटारीत जाऊन उलटी पडली. या रस्त्यालगत असलेले एका दुकानात सूरज भारद्वाज नावाचे रहिवासी झोपले होते. अपघाताचा मोठा आवाज ऐकून त्यांनी रस्त्यावर धाव घेतली. यावेळी आणखी काहीजण आले. घटनास्थळी असलेल्या काहींनी गाडीतून आकाशला बाहेर काढले. त्यानंतर त्याला रुग्णालयात पाठविले. ही घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही.

राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष

या परिसरातील जागरुक नागरीक संतोष भारद्वार यांनी सांगितले की, या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट आहे. कंत्रटदाराकडून अर्धवट कामाच्या ठिकाणी कोणत्याही सूचना नाही. तसेच रेडीयम पट्टी लावलेली नाही. या ठिकाणी वारंवार अपघात होतात. त्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष आहे. घटना घडल्यावर त्याठिकाणी कंत्रटदाराने त्याचे कामगार पाठविले. त्यानंतर दिवसभर कामगार अर्धवट कामाच्या ठिकाणी उघड्या असलेल्या लोखंडी गज वाकविण्याचे काम करीत होते. तसेच शेजारी असलेले कल्वर्टचा खड्डा जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून बुजविला गेला.

अंबरनाथमध्ये भरधाव बसची दुचाकीस्वाराला धडक

दरम्यान, अंबरनाथमध्येही दोन दिवसांपूर्वी भीषण अपघाताची घटना समोर आली होती. भरधाव बसने दुचाकीस्वाराला उडवून 10 ते 15 फूट लांब फरफटत नेल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर दरम्यानच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री ही घटना घडली. अंबरनाथच्या चिखलोली पाडा परिसरात राहणारे मंगेश पवार हे त्यांची पत्नी धनश्रीसोबत अंबरनाथहून विठ्ठलवाडीच्या दिशेने त्यांच्या दुचाकीवर जात होते. यावेळी मागून आलेल्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली

अपघातामुळे तरुणाची प्रकृती गंभीर

पवार पती-पत्नीची दुचाकी अंबरनाथ आणि उल्हासनगर दरम्यानच्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आली असता रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी केला. यावेळी मागून आलेल्या भरधाव बसने त्यांना जोरदार धडक दिली. इतकंच नव्हे, तर त्यांना तब्बल 10 ते 15 फूट लांबपर्यंत फरपटत नेले. या अपघातात मंगेश पवार यांच्या डोक्याला, चेहऱ्याला, छातीला दुखापत झाली असून पोटातही अंतर्गत दुखापत झाली आहे. सुदैवाने त्यांच्या पत्नीला मात्र काहीही इजा झालेली नाही. तर अपघातात त्यांच्या गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

हेही वाचा :

जमिनीच्या वादाने डोकं भडकलं, दिराने भावजयीच्या डोक्यात फावडा घातला; हत्येच्या घटनेने खळबळ

श्रीरामांच्या विरहात दशरथ राजाने मंचावर प्राण सोडला, ‘रामलीला’त चटका लावून जाणारी खरी एक्झिट, सहकलाकार-प्रेक्षकांचा आक्रोश

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI