AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका कायम, कार चालकाचं नियंत्रण सुटलं अन्…

नातेवाईकांना मुंबईला सोडून घरी परतत होते. मात्र समृद्दी महामार्गावर काळाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका कायम, कार चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...
समृद्धी महामार्गावर अपघातात चार ठारImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 12, 2023 | 2:11 PM
Share

अहमदनगर : समृद्धी महामार्गावरील अपघाताचे क्षेत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही आहे दररोज या मार्गावर अपघाताच्या घटना उघडकीस येत आहे. अशीच एक घटना आज सकाळी घडली आहे. नातेवाईकांना मुंबईला सोडून घरी परतत असताना कुटुंबीयांच्या कारला समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही अपघाताची घटना घडली आहे. इनोव्हा कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षक भिंतीवर जाऊन हा अपघात घडला. या भीषण अपघातात कारमधील चार जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईहून घरी परतत असताना अपघात

रज्जाक अहमद शेख, सत्तार शेख, सुलताना सत्तार शेख यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर फैयाज रघुभाई शेख यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जुबेर रज्जाक शेख, मैनुरीसा रज्जाक शेख, अझर बालन शेख आणि मुस्कान अझर शेख हे चौघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व जण मुंबईला गेले होते. नातेवाईक हज यात्रेला चालले होते. त्यांना सोडण्यासाठी हे सर्व जण मुंबईला गेले होते. तेथून घरी परतत असताना ही अपघात घडला.

वर्ध्यातही समृद्धी महामार्गावर अपघात

वर्ध्यातही समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना घडली आहे. अनियंत्रीत कार दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. येळाकेळी शिवारात काल दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. नागपूरकडून कार मुंबईकडे जात असताना येळाकेळी शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या सिमेंट दुभाजकाला धडकली. जखमींना समृद्धी महामार्ग रुग्णवाहिकेच्या मदतीने सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Follow Us
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....