Sangli Suicide : सांगलीत महिला पोलिसाच्या पतीची आत्महत्या, व्यावसायिक नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊल

| Updated on: Feb 10, 2022 | 12:05 AM

जितेंद्र पाटील हे मूळचे मिरज तालुक्यातील बेडग येथील रहिवासी आहेत. कामानिमित्त पाटील कुटुंबासह यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्राच्या पाठीमागे भाड्याच्या घरात राहत होते. पाटील यांचा गावात दूध संकलनाचा व्यवसाय होता. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात यश मिळत नसल्याने पाटील चिंतेत होते.

Sangli Suicide : सांगलीत महिला पोलिसाच्या पतीची आत्महत्या, व्यावसायिक नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊल
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

सांगली : व्यावसायिक नैराश्येतून महिला पोलिसाच्या पतीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सांगलीतील यशवंतनगरमध्ये घडली आहे. जितेंद्र शहाजी पाटील (38) असे महिला पोलिसाच्या मयत पतीचे नाव आहे. जितेंद्र पाटील (Jitendra Patil) यांनी राहत्या घराच्या लोखंडी जिन्याला बुधवारी पहाटे नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. (Husband of female police officer commits suicide due to professional depression in Sangli)

व्यावसायिक नैराश्येतून आत्महत्या

जितेंद्र पाटील हे मूळचे मिरज तालुक्यातील बेडग येथील रहिवासी आहेत. कामानिमित्त पाटील कुटुंबासह यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्राच्या पाठीमागे भाड्याच्या घरात राहत होते. पाटील यांचा गावात दूध संकलनाचा व्यवसाय होता. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात यश मिळत नसल्याने पाटील चिंतेत होते. या चिंतेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिली असून यात व्यावसायिक नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

सांगलीत आईची हत्या करुन मुलाची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून वृद्ध आईची हत्या करुन मुलाने स्वतः आत्महत्या केल्याची घटना सांगलीत उघडकीस आली आहे. रतन रामचंद्र कांबळे (80) आणि शशिकांत कांबळे (47) अशी मयत माय-लेकांची नावे आहेत. शशिकांत यांना दम्याचा आजार होता. शशिकांत यांच्या पश्चात पत्नी व मुले आहेत. पत्नी मुलांसह माहेरी गेली असताना शशिकांत यांनी आईचे व स्वतःचे जीवन संपवले. शशिकांत यांना दम्याचा त्रास होता. यामुळे सततच्या आजारपणामुळे ते नैराश्येत गेले होते. शशिकांत यांचे आई-वडिल दोघेही निवृत्त शिक्षक होते. शशिकांत यांचे स्वतःचे कपड्यांचे दुकान होते. वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आपल्या पश्चात आपल्या आईची काळजी कोण घेणार या चिंतेतून त्यांनी आईलाही मारण्याचा निर्णय घेतला. आष्टा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Husband of female police officer commits suicide due to professional depression in Sangli)

इतर बातम्या

Kalyan Crime : पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी आत्मघातकी बनाव, कल्याण स्थानकातील धक्कादायक प्रकार

pimpri chinchawad crime | पिंपरीत सतत पोलीस चौकशीला कंटाळून मजुराने केली आत्महत्या