Kalyan Crime : पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी आत्मघातकी बनाव, कल्याण स्थानकातील धक्कादायक प्रकार

उल्हासनगरमध्ये राहणारे व्यावसायिक दिलीप चूग हे मंगळवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कल्याण स्टेशनच्या फलाट क्रमांक 2 वर उभे होते. त्यांना उल्हासनगरला जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती. थोड्या वेळातच कजर्त ट्रेन आली. या दरम्यान प्रवाशांची एकच गर्दी होती. यावेळी गर्दीत चूग हे ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात होते.

Kalyan Crime : पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी आत्मघातकी बनाव, कल्याण स्थानकातील धक्कादायक प्रकार
पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी आत्मघातकी बनाव, कल्याण स्थानकातील धक्कादायक प्रकार
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 9:55 PM

कल्याण : लोकल ट्रेनमध्ये चढताना व्यापाऱ्याची पर्स हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला रेल्वे क्राईम ब्रांच (Railway Crime Branch) पोलिसांनी पाठलाग करुन पकडले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. इरफान सय्यद (Irfan Sayyad) असे या चोरट्याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी त्याला पकडू नये यासाठी त्याने चाकूने स्वत:ला जखमी करुन घेतले. मात्र त्याची ही पळून जाण्याची शक्कल पोलिसांसमोर काही उपयोगाची ठरली नाही. इरफान हा सराईत गुन्हेगार आहे. उल्हासनगरमधील व्यावसायिक दिलीप चूग हे कल्याण स्थानाकातून उल्हासनगरला जाण्यासाठी ट्रेन पकडत असताना चोरट्याने त्यांची पर्स हिसकावून पळ काढला. मात्र रेल्वे क्राईम ब्रांचमुळे चोरट्याचा प्रयत्न फसला. (Railway police caught a thief stealing a passenger’s wallet at Kalyan railway station)

ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असताना चोरट्याने खिशातले पाकिट काढले

उल्हासनगरमध्ये राहणारे व्यावसायिक दिलीप चूग हे मंगळवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कल्याण स्टेशनच्या फलाट क्रमांक 2 वर उभे होते. त्यांना उल्हासनगरला जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती. थोड्या वेळातच कजर्त ट्रेन आली. या दरम्यान प्रवाशांची एकच गर्दी होती. यावेळी गर्दीत चूग हे ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात होते. तेवढ्यात मागून एका चोरट्याने त्यांच्या पॅण्टच्या खिशातील पर्स हिसकावून पळ काढला. याचवेळी रेल्वे क्राईम ब्रांचच्या पोलिसांची नजर चोरट्यावर होती. फलाटावर फिरताना इरफानवर रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस कर्मचारी कुणाल तायडे आणि कुणाल वालडे यांची नजर होती. जसे इरफानने व्यापारी दिलीप यांची पर्स हिसकावून पळ काढला. या दोन्ही पोलिसांनी इरफानचा पाठलाग केला.

रेल्वे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

थोड्याच अंतरावर दोन्ही पोलिसांनी इरफानला पकडले. यावेळी इरफानने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी एक शक्कल लढवली. स्वत: जवळील चाकूने स्वत:च्याच गळ्यावर जखमा केल्या. स्वत:ला जखमी करुन आत्महत्येचा बनाव केला. मात्र दोन्ही पोलिासांनी या बनावला भीक घातली नाही. त्याच्या मुसक्या आवळत त्याला ताब्यात घेतले. दोन्ही पोलिसांच्या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून धावत्या ट्रेनमध्ये आणि फलाटावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत आहेत. एकीकडे हे स्पष्ट आहे की, गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. मात्र आरपीएफ जीआरपी यांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. (Railway police caught a thief stealing a passenger’s wallet at Kalyan railway station)

इतर बातम्या

pimpri chinchawad crime | पिंपरीत सतत पोलीस चौकशीला कंटाळून मजुराने केली आत्महत्या

Washim Theft : चोरट्यांनी महिलेला पुजेसाठी मंदिरात नेले अन् गळ्यातील पोत घेऊन पसार झाले; वाशिममध्ये पिंपरी सरहद्द येथील घटना

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.