Wardha Attack : ‘साहब, कितना भी मार लो लेकीन झुकेगा नही.. साला..!!’ वर्धेचा अल्पवयीन पुष्पा पोलिसांच्या ताब्यात

शाळेपासून 17 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत असलेल्या जुना वादाचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. यात आरोपी युवकावर नव्याने प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाचा फिवर चढला होता. आरोपी मुलाला ताब्यात घेतले असता त्याच्यावर पुष्पा चित्रपटचा प्रभाव पडलेला दिसून आला. तो वेगवेगळे डायलॉग मारत होता.

Wardha Attack : 'साहब, कितना भी मार लो लेकीन झुकेगा नही.. साला..!!' वर्धेचा अल्पवयीन पुष्पा पोलिसांच्या ताब्यात
वर्ध्यात जुन्या वादातून अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चाकू हल्ला
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 4:47 PM

वर्धा : तरुणांना सध्या नवीन सिनेमांचे वेड लागले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाच्या डायलॉग आता जागोजागी ऐकायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर सिनेमाच्या ऍक्शनचा सध्या तरुणांवर फिवर चढला आहे. अशाच एका पुष्पाला सेवाग्राम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका जुन्या वादातून या अल्पवयीन पुष्पाने दुसऱ्या अल्पवयीन मुलावर चाकूने वार (Knife Attack) केल्याची घटना मंगळवारी गांधीग्राम महाविद्यालयाच्या परिसरात घडली. जखमी मुलावर सध्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणताच त्याने पोलिसांना पाहून ”साहब, कितना भी मार लो लेकिन झूकेगा नहीं… साला, मै झुकेगा नाही मुझे बहोत मारो लेकिन मेरे माँ बाप को कुछ मत बोलो ..” असे म्हणत पोलिसांशीच हुज्जत घातली. (Attack on a minor boy in an old dispute in Wardha, minor Pushpa in police custody)

जुन्या वादाचे पर्यावसन हाणामारीत

वर्धेच्या गांधीग्राम महाविद्यालयात घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहे. याला कारणही तसंच आहे. शाळेपासून 17 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत असलेल्या जुना वादाचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. यात आरोपी युवकावर नव्याने प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाचा फिवर चढला होता. आरोपी मुलाला ताब्यात घेतले असता त्याच्यावर पुष्पा चित्रपटचा प्रभाव पडलेला दिसून आला. तो वेगवेगळे डायलॉग मारत होता. त्यामुळे पालकांनी आपला पाल्य काय करतो ? काय पाहतो ? कुठे जातो ? हे तपासण्याची गरज आहे. अन्यथा मोठी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आवाहन सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांनी केले आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले असता तो फिल्मी डायलॉग मारत होता. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या मुलाचे समुपदेशन करून त्याला अशी घटना यापुढे न करण्याचे समजावून सांगितले. त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नाशिकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी

कॉलेजच्या प्रपोज डे च्या दिवशी काही कारणावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नाशिकच्या निफाड तालुक्यातील एका कॉलेजमध्ये घडली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओ विद्यार्थ्यांमध्ये फ्री स्टाईल फायटिंग सुरु असल्याचे दिसत आहे. आधी या विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरु होता. मग बघता बघता या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. विद्यार्थ्यांचा दोन्ही गटाने एकमेकांना फ्री स्टाईल फायटिंग करत एकमेकांची धुलाई केली. मात्र हा वाद नेमका कोणत्या कारणावरुन झाला हे अद्याप कळू शकले नाही. (Attack on a minor boy in an old dispute in Wardha, minor Pushpa in police custody)

इतर बातम्या

नागपुरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; दिल्ली पासिंग कारमधून तस्करी, सिटच्या खाली ठेवला गांजा

Sangli Crime : आधी वृद्ध आईचा गळा आवळला, मग स्वतः गळफास घेतला; वाचा सांगलीत नेमकं काय घडलं ?

Non Stop LIVE Update
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.