AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Crime : आधी वृद्ध आईचा गळा आवळला, मग स्वतः गळफास घेतला; वाचा सांगलीत नेमकं काय घडलं ?

शशिकांत यांची पत्नी मुलांसह मंगळवारी माहेरी गेली होती. त्यामुळे घरी शशिकांत व त्यांची आई दोघेच होते. आजारपणाच्या नैराश्येतून त्यांनी कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.

Sangli Crime : आधी वृद्ध आईचा गळा आवळला, मग स्वतः गळफास घेतला; वाचा सांगलीत नेमकं काय घडलं ?
आधी वृद्ध आईचा गळा आवळला, मग स्वतः गळफास घेतला; वाचा सांगलीत नेमकं काय घडलं ?
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Feb 09, 2022 | 4:05 PM
Share

सांगली : आजारपणाला कंटाळलेल्या मुलाने आधी वृद्ध आईची गळा आवळून हत्या (Murder) करुन मग स्वतः गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सांगलीतील आष्टा येथील दत्त वसाहतीत घडली आहे. रतन रामचंद्र कांबळे (80) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे तर शशिकांत कांबळे (47) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. शशिकांत कांबळे यांना दम्याचा त्रास होता. त्यामुळे ते सतत आजारी असत. याच आजारपणामुळे त्यांना नैराश्य आले होते. शशिकांत यांच्या पश्चात पत्नी व मुले आहेत. पत्नी मुलांसह माहेरी गेली असताना घरी कुणी नाही याची संधी साधत शशिकांत यांनी आईसह स्वतःचे जीवन संपवले. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात हत्या व आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. आष्टी पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Son commits suicide by killing mother due to illness in Sangli)

आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

सांगलीच्या आष्टा येथील दत्त वसाहतीमध्ये कांबळे कुटुंबिय राहतात. शशिकांत यांचे वडिल रामचंद्र कांबळे आणि आई रतन कांबळे हे दोघेही प्राथमिक शाळेत शिक्षक होते. वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तर मयत शशिकांत यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. आष्टा शहरात शशिकांत यांचे कपड्याचे दुकान आहे. शशिकांत यांची पत्नी मुलांसह मंगळवारी माहेरी गेली होती. त्यामुळे घरी शशिकांत व त्यांची आई दोघेच होते. आजारपणाच्या नैराश्येतून त्यांनी कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. शशिकांत यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून यात माझ्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे. आईला सांभाळण्यास कोणी नसल्याने मी आईला माझ्यासोबत घेऊन जात आहे, असे लिहिले आहे.

नागपुरात पतीच्या विरहात पत्नीची पेटवून घेऊन आत्महत्या

पतीच्या निधनानंतर त्याच्या आठवणीने बैचेन झालेल्या पत्नीने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील कळमेश्वर तालुक्यातील सावंगी तोमर गावात घडली आहे. शोभाबाई भोतमांगे असे मयत महिलेचे नाव आहे. शोभाबाईंनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. शोभाबाईंचे पती गोपाळराव भोतमांगे यांचा काही दिवसांपूर्वी नदीत बुडून मृ्त्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर शोभाबाई त्यांच्या आठवणीने दुःकी असायच्या. पतीचा विरह त्यांना सहन होत नव्हता. यामुळेच नैराश्येतून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी मुलाने दिलेल्या माहितीनुसार कळमेश्वर पोलीस ठाण्याच मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Son commits suicide by killing mother due to illness in Sangli)

इतर बातम्या

अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप

अंकिता जळीतकांड प्रकरण : आरोपीला दोषी ठरविल्याने आई-वडील समाधानी, तर बचाव पक्षाची तयारी काय?

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान