AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pimpri chinchawad crime | पिंपरीत सतत पोलीस चौकशीला कंटाळून मजुराने केली आत्महत्या

बासाहेब काटे यांचेसह सुमारे 20  जणांची लोणी काळभोर, लोणीकंद पोलीसांसह क्राईम ब्रँच युनिट 6 च्या पथकाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. मात्र या चौकशीला कंटाळून काटे यांनी आत्महत्या केली.

pimpri chinchawad crime | पिंपरीत सतत पोलीस चौकशीला कंटाळून मजुराने केली आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 09, 2022 | 5:59 PM
Share

पिंपरी – शहरातील सांडस येथे काही दिवसांपूर्वी संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय 45,हवेली ) या व्यक्तीचा हत्या( murder )  झाल्याची घटना घडली होती. हत्या झालेली व्यक्ती मासेमारीचा व्यवसाय करत होती. या घटनेनंतर पोलिसांनी बाबासाहेब बबन काटे (वय-32, रा. भवरापूर, ता. हवेली) या व्यक्तीची पोलिसांनी गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी चौकशी केली. पोलिसांनी सलग तीन दिवस झालेलया चौकशी मुळे नैराश्यात गेलेल्या बाबासाहेब काटे याने विष(poison) पिऊन आत्महत्या (Suicide)केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून झालेल्या चौकशीमुळे खुनाचा आरोप आपल्यावर येईल अशी भीती वाटल्याने आत्महत्या केल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं

काही दिवसांपूर्वी संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड हे बहिणीकडे जातो असे सांगून घराच्या बाहेर पडले. त्यानंतर चार दिवसांनी त्याचे त्यांचा मृतदेह शरीराचे धड व हात – पाय छाटलेल्याअवस्थेत अर्धवट मृतदेह मिळून आला होता.त्यानंतर आणखी दोन दिवसांनी उरलेला मृतदेह आढळून आला. या हत्येच्या घटनेने स परिसरात खळबळ निर्माण झाली. त्यानंतर याप्रकरणी बाबासाहेब काटे यांचेसह सुमारे 20  जणांची लोणी काळभोर, लोणीकंद पोलीसांसह क्राईम ब्रँच युनिट 6 च्या पथकाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. मात्र या चौकशीला कंटाळून काटे यांनी आत्महत्या केली. काटेने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या चौकशीत बरे वाईट होईल या भीतीने आपण आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे.

पोलिस चौकशी जावे लागत असल्याने माझ्या कामाच्या ठिकाणी खाडे होत आहेत. माझ्याकडे पैसे नाहीत व मी मेल्यानंतर माझ्या मुलीचे व बायकोचे कसे होणार? माझ्यावर कोणताही दबाव नाही. घरच्यांना कोणीही त्रास देऊ नका. मला जेवढी माहिती होती तेवढी मी पोलिसांना दिली आहे. मला मरायचे नव्हते पण माझे नाव आले त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मी जेवलो नाही किंवा मला झोपही लागली नाही. मला माझ्या मुलीला शिकवायचे होते. परंतु मला खूप टेंशन आल्यामुळे मी औषध घेत आहे. पोलिसांना जबाबदार ठरवत नसल्याचेही चिट्ठीत नमूद करण्यात आले आहे.

चक्क सरकारच्या नावाने लॉटरीचं आमिष, “सजग राहा”, सरकारकडून सावधानतेचा इशारा

IND VS WI: ‘अरे निघालात कुठे थांबा’, विराट-रोहित अंडर 19 टीमसमोर फेल

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान