AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्क सरकारच्या नावाने लॉटरीचं आमिष, “सजग राहा”, सरकारकडून सावधानतेचा इशारा

चक्क सरकारच्या नावाचा वापर करून लॉटरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात येत आहे. लॉटरी जिंकल्याच्या संशयास्पद कॉल, एसएमएस, ईमेलपासून सावध राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे. थोड्याशा लालसेपोटी नागरिकांनी स्वतः चे नुकसान करु नये असे आवाहन शासनाने केले आहे.

चक्क सरकारच्या नावाने लॉटरीचं आमिष, सजग राहा, सरकारकडून सावधानतेचा इशारा
लॉटरी
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 5:35 PM
Share

मुंबई : ‘अभिनंदन, तुम्ही एक लाखाची लॉटरी जिंकली!’ अशा अनेक संदेशांना, भुलथापांना बळी पडून पायावर धोंडा पाडून घेऊ नका. देशात रोज अनेक लोकांची ऑनलाईन घोर फसवणूक होते. तुम्ही या जाळ्यात अडकू नका. लॉटरी जिंकल्याच्या संशयास्पद कॉल, एसएमएस, ईमेलपासून सावध राहण्याचा सरकारने इशारा दिला आहे. आजकाल लॉटरीशी (Lottery) संबंधित फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. लोकांच्या मोबाईलवर लॉटरी जिंकल्याचे मेसेज येत आहेत. काही वेळा फसवणूक करणारे नामांकित आणि नावाजलेल्या ब्रँडच्या नावाचा वापर करतात. त्यावर भूलून लोक आयतेच या ट्रॅप मध्ये अडकतात. आता तर चक्क सरकारच्या नावाचा वापर करून लॉटरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात येत आहे. हा नवीन ट्रेंड घातक ठरू शकतात. सरकारची बदनामी तर होतेच पण नागरिकांची फसवणूक ही होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाइन सल्ला वजा सूचना (Advisory) देत नागरिकांना अशा योजनांपासून सावध केले आहे.

लॉटरीशी संबंधित संशयास्पद मेसेजेस, ईमेल किंवा कॉल्सही तुम्हाला येत आहेत का? लॉटरीशी संबंधित अशा बनावट मेसेजेस, कॉल्स आणि ईमेलपासून सावध राहा. अशी सूचना भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) दिली आहे. आर्थिक फसवणुकीसाठी ठग याचा आधार घेत आहे. पैशांच्या आमिषाने या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करत पीआयबीने वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील सामायिक (Share) न करण्याचा सल्ला दिला.

लॉटरी घोटाळ्यांपासून सावध राहा :

याशिवाय, पीआयबीने अशा फसवणुकीपासून नागरिकांना मदत करण्यासाठी एक Factree देखील शेअर केली आहे.

1. भारत सरकारच्या नावाने अनेक बनावट लॉटरी घोटाळे चालवले जात आहेत. 2. लॉटरी जिंकल्याचा फोन कॉल/ई-मेल/मेसेज आला असेल, तर ताबडतोब सावध व्हा. 3. आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स शेअर करु नका. 4. स्पॅम किंवा अवांछित मेल ताबडतोब हटवा.

पीआयबी फॅक्ट चेक म्हणजे काय?

पीआयबी फॅक्ट चेक मध्ये सरकारी धोरणे किंवा योजनांबद्दल चुकीची माहितीची तपासणी करण्यात येते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खोटी असल्याचा संशय आला तर तुम्ही पीआयबी फॅक्ट चेकला याबाबत माहिती देऊ शकता. यासाठी तुम्ही या मोबाइल क्रमांकावर 918799711259 माहिती पाठवू शकता किंवा socialmedia@pib.gov.in ईमेल आयडीवरही माहिती पाठवू शकता.

फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअॅपवर सावधानता बाळगा

सायबर गुन्हेगार सोशल मीडियाचा वापर करून फसवणूक करतात. मोबाइल किंवा इंटरनेटवर फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअ ॅपवर विविध प्रकारचे उत्सव थीम, गेम्स, अॅप्स किंवा लिंक्स यांचा वापर करून लोकांना जाळ्यात अडकविण्यात येते आणि फसवणूक करण्यात येते.

संबंधित बातम्या

Share market मध्ये तेजीचे सत्र; अदानी विल्मरचा शेअर आजही ‘रॉकेट’

IPPB: बचत खाते बंद झाल्यास 150 रुपयांचा दंड, 5 मार्चपासून नियम लागू

सरकारी e-Marketplace पोर्टलची अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला धोबीपछाड, डिस्काऊण्टमध्ये अव्वल

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.