AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share market मध्ये तेजीचे सत्र; अदानी विल्मरचा शेअर आजही ‘रॉकेट’

मंगळवारी व्यवहार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स 187.39 अंकांनी वधारून 57,808.58 अंकांवर बंद झाला होता. NSEचा निफ्टीही जवळपास 0.30 टक्क्यांनी वधारुन 17,266.70 अंकांवर बंद झाला. परदेशी भांडवलदारांनी विक्रीच्या माध्यमातून बाजारावर अजूनही दबाव कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे जागतिक बाजारपेठेबरोबरच काही देशांतर्गत घटकांकडूनही बाजारातील उलाढाल कायम आहे.

Share market मध्ये तेजीचे सत्र; अदानी विल्मरचा शेअर आजही 'रॉकेट'
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 2:30 PM
Share

देशांतर्गत शेअर बाजाराने मंगळवारी ट्रेडिंगला जोरदार सुरुवात केली, व्यापार सुरू होताच बाजार 0.60 टक्क्यांनी वधारला आणि सुरुवात होण्यापूर्वी वाढीचे संकेत दिले. आज बीएसई (BSE) सेन्सेक्स आणि एनएसईचा (NSE) निफ्टी दोन्ही नफ्यात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजार सुरू होण्यापूर्व सत्रात सेन्सेक्सने 350 हून अधिक अंकांची झेप घेतली आणि 58 हजारांचा टप्पा ओलांडला. बाजार उघडल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली, पण सेन्सेक्स जवळपास 330 अंकांनी वधारून 58,100 अंकांच्या पुढे झेपावला. व्यापाराच्या अल्प कालावधीनंतर एकदा जबरदस्त तेजी दिसून आली. या तेजीने पाचशेचा टप्पा ओलांडला. निफ्टी 0.65 टक्क्यांनी वधारून सुमारे 17,380 अंकांवर पोहचला होता. सिंगापूरचा निर्देशांक एसजीएक्स (SGX Nifty) चार परिणाम पूर्णपणे देशांतर्गत बाजारात दिसून आला. बाजार सकारात्मक राहण्याची संकेत मिळाले.

IPO वर गुंतवणुकदारांच्या उड्या

Adani Wilmar शेअरमध्ये आज जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बाजार उघडताच त्याचा शेअर 10 टक्क्यांनी वधारला. काही वेळातच हा शेअर 12.50 टक्क्यांहून अधिक वधारून 300 रुपयांच्या जवळपास पोहोचला. अदानी विल्मर आयपीओ 27 जानेवारी रोजी बाजारात दाखल झाला आणि ३१ जानेवारीला हा आयपीओ बंद झाला. 17 पेक्षा जास्त पट्टीत या आयपीओची खरेदी झाली. गुंतवणुकदारांच्या उड्या पडल्या.

डाऊमध्ये तेजी

अमेरिकी बाजारात मंगळवारी तेजी आली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अवॉर्ड्समध्ये 1.06 टक्के, एस अँड पी 500मध्ये 0.84 टक्के आणि नुसडॅक कम्पोजिटमध्ये 1.28 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. आशियाई बाजार आजही आघाडीवर आहेत. जपानचा निक्केई आणि टोपिक्स इंडेक्स या दोन्ही निर्देशांक 0.80 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत.

रिव्हर्स रेपो दर ठरणार

दरम्यान, रिझर्व्ह बँकेची एमपीसी (MPC) बैठक सुरू असून, या बैठकीचे फलित उद्या लक्षात येईल. या बैठकीत रिव्हर्स रेपो रेट 0.20 टक्क्यांनी वाढून 3.55 टक्क्यांवर पोहचले, असे विश्लेषकांचे मत आहे.

एलआयसी आयपीओ अंतिम टप्प्यात

देशातील सर्वात मोठ्या आयपीओची कागदपत्रे या आठवड्यात सेबीकडे सादर केली जाणार आहेत. कागदपत्रे गुरुवारी किंवा शुक्रवारी सादर करता येतील असे दीपमच्या (DIPAM) सचिवांनी सांगितले आहे.

बाजार सावरला

याआधी मंगळवारी बाजार तीन दिवसांच्या घसरणीतून सावरण्यात यशस्वी झाला होता. मंगळवारी व्यवहार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स 187.39 अंकांनी वधारून 57,808.58 अंकांवर बंद झाला होता. NSEचा निफ्टीही जवळपास 0.30 टक्क्यांनी वधारुन 17,266.70 अंकांवर बंद झाला. परदेशी भांडवलदारांनी विक्रीच्या माध्यमातून बाजारावर अजूनही दबाव कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे जागतिक बाजारपेठेबरोबरच काही देशांतर्गत घटकांकडूनही बाजारातील उलाढाल कायम आहे.

इतर बातम्या-

अमरावतीत पालिका आयुक्तांच्या अंगावर बाटलीभर शाई फेक, जीवाच्या आकंताने पळाले तरीही महिलांनी घेरलं

अंकिता जळीतकांड प्रकरण : आरोपीला दोषी ठरविल्याने आई-वडील समाधानी, तर बचाव पक्षाची तयारी काय?

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.