AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS WI: ‘अरे निघालात कुठे थांबा’, विराट-रोहित अंडर 19 टीमसमोर फेल

हा सामना पाहताना अंडर 19 संघातील खेळाडू नक्कीच निराश झाले असतील. कारण त्यांचे आदर्श विराट कोहली आणि रोहित शर्मा फ्लॉप झाले.

IND VS WI: 'अरे निघालात कुठे थांबा', विराट-रोहित अंडर 19 टीमसमोर फेल
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 5:27 PM
Share

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेला दुसरा वनडे (India vs West Indies, 2nd ODI) सामना पाहण्यासाठी अंडर 19 वर्ल्डकप विजेता संघ पोहोचला आहे. मागच्याच आठवड्यात यश धुलच्या (Yash dhull) या टीमने इंग्लंडला हरवून वर्ल्डकपच जेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये दाखल झालेल्या या अंडर 19 टीमचा (India Under-19) सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांना भारताच्या सिनियर संघाचा खेळ पाहण्याची संधी देण्यात आली. अंडर 19 संघातील सर्वच खेळाडू सिनियर खेळाडूंचा खेळ पाहत होते. बीसीसीआयने हे फोटो आपल्या टि्वट हँडलवर शेअर केले आहेत. हा सामना पाहताना अंडर 19 संघातील खेळाडू नक्कीच निराश झाले असतील. कारण त्यांचे आदर्श विराट कोहली आणि रोहित शर्मा फ्लॉप झाले. त्याचवेळी सूर्यकुमार यादव, केएल राहुलचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फार काही करु शकले नाहीत.

रोहित शर्मा पाच आणि विराट कोहली 18 धावांवर आऊट झाला. दोघेही खूप सहज आऊट झाले. त्यांना टाकलेले चेंडू खूपच अप्रतिम होते, असं नाहीय. रोहितने तिसऱ्या षटकात रोचच्या गोलंदाजीवर झेल दिला. कोहलीला 12 व्या षटकात ओडीन स्मिथने बाद केलं. ऋषभ पंतही 18 धावांवर आऊट झाला.

टीम इंडियाचे फलंदाज ट्रोल अंडर 19 वर्ल्डकप जिंकून आलेल्या टीम समोर हे रथी-महारथी फलंदाज ज्या पद्धतीने बाद होत होते, त्यावर सोशल मीडियावर फॅन्सनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. पंत, रोहित आणि विराट ज्या पद्धतीने बाद झाले, त्यानंतर फॅन्सी अंडर 19 टीम यांच्यापेक्षा चांगली खेळते, असं फॅन्सनी म्हटलं.

india under 19 team felicitated in ahmedabad ind vs wi 2nd odi fans troll senior players

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.