AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: ज्याच्यासोबत भेदभाव झाला, त्याच खेळाडूने टीम इंडियाला सुरुवातीला दिले ‘धक्के’

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) दुसरा वनडे सामना सुरु आहे. आज नाणेफेकीच्यावेळी वेगळंच दृश्य पाहायला मिळालं.

IND vs WI: ज्याच्यासोबत भेदभाव झाला, त्याच खेळाडूने टीम इंडियाला सुरुवातीला दिले 'धक्के'
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 5:03 PM
Share

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) दुसरा वनडे सामना सुरु आहे. आज नाणेफेकीच्यावेळी वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. कर्णधार रोहित शर्मा सोबत टॉसच्यावेळी वेस्ट इंडिजचा नियमित कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) नव्हता. पोलार्ड दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीय. त्याच्याजागी ओडियन स्मिथला संधी मिळाली आहे. ओडियन स्मिथने (Odean Smith) मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत भारताला धक्के दिले. ज्यामुळे भारताचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. ओडियन स्मिथ तोच खेळाडू आहे, ज्याच्यावरुन विंडीज टीम मॅनेजमेंटवर भेदभावाचे आरोप झाले होते. पहिल्या वनडेमध्ये पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली. पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजची जी हालत केली होती, दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजनेही तशीच सुरुवात केली. ओडियन स्मिथने यात महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाने आज ऋषभ पंतला सलामीला आणून सर्वांनाच धक्का दिला. पण हा प्रयोग यशस्वी ठरला नाही. कारण ओडियन स्मिथने पंतला माघारी धाडलं.

एकाच षटकात दोन महत्त्वाच्या विकेट

भारताची सुरुवात खूप निराशाजनक होती. मागच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा कर्णधार रोहित शर्मा आज तिसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर विराट कोहली क्रीझवर आला. त्याच्यावर आणि पंतवर डाव सावरण्याची जबाबदारी होती. दोघे डाव सावरतायत असे वाटत असताना मध्यमगतीने गोलंदाजी करणाऱ्या ओडियन स्मिथने आपल्या दुसऱ्याच षटकात भारताला धक्का दिला.

स्मिथने आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पंतला बाद केलं. त्यानंतर त्याने कोहलीला शॉर्ट पिच चेंडू टाकले. त्यानंतर कोहली स्मिथच्या गोलंदाजीवर ड्राइव्ह करण्याच्या प्रयत्नात विकेटकिपरकडे सोपा झेल दिला. स्मिथमुळे एकाच षटकात भारताची अवस्था तीन बाद 43 अशी झाली.

स्मिथ सोबत भेदभाव केल्याचा आरोप

मागच्या महिन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये टी 20 सीरीज झाली. त्यावेळी पोलार्ड आणि स्मिथमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत स्मिथला संघात संधी मिळत नव्हती. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या संघ व्यवस्थापनावर स्मिथ सोबत भेदभाव केला जात असल्याचे आरोप होत होते. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या कोचला संघात असे कुठलेही मतभेद नाहीयत, असं समोर येऊन सांगाव लागलं होतं.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.