Rishabh pant: पंत सलामीला येतो, मग पुण्याच्या ऋतुराजला संधी कधी मिळणार? नेटीझन्सच्या भन्नाट Reaction

वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीम मध्ये आज एक बदल करण्यात आला. पण त्याचवेळी रोहित-राहुल जोडीने एक नवा प्रयोगही करुनही बघितला.

Rishabh pant: पंत सलामीला येतो, मग पुण्याच्या ऋतुराजला संधी कधी मिळणार? नेटीझन्सच्या भन्नाट Reaction
twitter
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 3:11 PM

अहमदाबाद: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीम मध्ये आज एक बदल करण्यात आला. पण त्याचवेळी रोहित-राहुल जोडीने एक नवा प्रयोगही करुनही बघितला. पण हा प्रयोग मात्र फसला आहे. सर्वप्रथम आपण बदल जाणून घेऊया. केएल राहुल (KL Rahul) दुसऱ्यावनडेपासून उपलब्ध झाल्यामुळे आक्रमक फलंदाज इशान किशनला बाहेर बसवण्यात आलं. इशान किशनने मागच्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध 28 धावांची खेळी केली होती. केएल राहुल संघात परतल्यामुळे तो रोहित सोबत सलामीला येईल, असं सर्वांना वाटलं होतं. पण असं घडलं नाही. टीम मॅनेजमेंटने आज सलामीच्या जोडीमध्ये बदल करुन क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला. के.एल.राहुल ऐवजी ऋषभ पंत (Rishabh pant) सलामीला आला. खरंतर ऋषभ पंत याआधी कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सलामीवीर म्हणून आलेला नाही. पंतला सलामीला आल्यानंतर टि्वटरवर वेगवेगळ्या पद्धतीची Reaction पाहायला मिळाल्या.

ऋषभ पंत सलामीला यायचा अंडर 19 क्रिकेटमध्ये खेळताना ऋषभ पंत सलामीला यायचा. 2015 आणि 2016 मध्ये सलामीवीर म्हणून त्याने 11 डावात 41.27 च्या सरासरीने 454 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि चार अर्धशतक आहेत. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत ऋषभ पंतने सलामीवीर म्हणून 267 धावा केल्या आहेत. योगायोग असा की, ऋषभ पंतला सलामीवीर म्हणून यायचा, त्या 2016 वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविड हेड कोच होते.

इशान किशनच्या जागी आता केएल राहुल संघात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील तिन्ही वनडेमध्ये तो सलामीला आला होता. टि्वटरवर अनेक जण या निर्णयावर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले आहेत. ऋषभ पंत सलामीला येत असेल, मग ऋतुराज गायकवाडला संधी कधी मिळणार ? असा सवाल एकाने विचारला आहे.

ऋतुराज गायकवाड सध्या आयसोलेशनमध्ये आहे. त्याला कोरोना झाला आहे. महाराष्ट्राच्या या गुणी फलंदाजाला अजून संधी मिळालेली नाही. दक्षिण आफ्रिकेतील तिन्ही वनडे सामन्यांमध्ये त्याच्याऐवजी शिखर धवनला खेळवण्यात आलं. पण त्याने सुद्धा तितकीच दमदार कामगिरी केली. स्थानिक क्रिकेट स्पर्धा आणि मागच्या आयपीएलच्या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाडने खोऱ्याने धावा केल्या होत्या.

Even Pant is opening, when will Gaikwad Fans stunned as Rishabh opens innings

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.