AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: अखेर हार्दिक पंड्या कॅप्टन असलेल्या अहमदाबाद संघाचं खरं नाव आलं समोर, ‘या’ नावाची घोषणा

भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik pandya) अहमदाबादचे नेतृत्व करत आहे. राशिद खान आणि शुभमन गिल हे दोन खेळाडूही अहमदाबादकडून खेळत आहेत.

IPL 2022: अखेर हार्दिक पंड्या कॅप्टन असलेल्या अहमदाबाद संघाचं खरं नाव आलं समोर, 'या' नावाची घोषणा
| Updated on: Feb 09, 2022 | 2:16 PM
Share

अहमदाबाद: इंडियन प्रिमियर लीगमध्ये नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रेंचायजीने (Ahmedabad Franchise) अखेर नावाची घोषणा केली आहे. भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik pandya) अहमदाबादचे नेतृत्व करत आहे. राशिद खान आणि शुभमन गिल हे दोन खेळाडूही अहमदाबादकडून खेळत आहेत. दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद फ्रेंचायचीने अहमदाबाद टायटन्स असं संघाचं नाव ठेवल्याची माहिती समोर आली होती. पण आता या संघाचं खर नाव समोर आलं आहे. अहमदाबाद टायटन्स नाही, तर ‘गुजरात टायटन्स’ (Gujarat Titans) असं संघाचं नामकरण करण्यात आलं आहे. हार्दिक पंड्या या टीमचा कॅप्टन आहे. सीवीसी कॅपिटलकडे अहमदाबाद फ्रेंचायजीची मालकी आहे. अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ यंदा IPL मध्ये आहेत.

लखनऊच्या टीमचे नाव लखनऊ सुपर जायंट्स आहे. आशिष नेहरा अहमदाबाद संघाचा मुख्य कोच आहे. गॅरी कर्स्टन संघाचे मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक आहेत. सीवीहसी कॅपिटलने 5625 कोटी रुपये मोजून अहमदाबाद संघ विकत घेतला आहे.

यापूर्वी सुद्धा IPL मध्ये होता गुजरातचा संघ यापूर्वी 2016 आणि 2017 IPL मध्ये गुजरातचा संघ होता. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ निलंबित झाल्यामुळे पुणे आणि राजकोट फ्रेंचायजीला संधी मिळाली होती. त्यावर्षी राजकोट फ्रेंचायजीने आपलं नाव गुजरात लायन्स ठेवलं होतं. सुरेश रैना या संघाचा कर्णधार होता. रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो आणि इशान किशन हे खेळाडू त्यावेळी गुजरातकडून खेळले होते. हा संघ 2016 IPL च्या प्लेऑफमध्ये पोहोचला होता.

लखनऊ संघही IPL चा भाग अहमदाबादशिवाय लखनऊ फ्रेंचायजी सुद्धा आयपीएलध्ये आहे. संजीव गोयनका यांच्याकडे लखनऊ संघाची मालकी आहे. लखनऊ सुपर जायंट्स असं या फ्रेंचायजीचं नाव आहे. त्यांनी 7090 कोटी रुपये मोजून हा संघ विकत घेतला आहे. केएल राहुल या टीमचा कॅप्टन आहे. मार्कस स्टोइनिस आणि रवी बिष्णोई हे खेळाडू लखनऊकडून खेळणार आहेत. गौतम गंभीर या संघाचा मार्गदर्शक आहे. झिम्बाब्वेचे अँडी फ्लॉवर संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

ipl 2022 hardik pandya led ahmedabad Franchise team name is gujarat titans

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.