AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या लोहारा ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार, माजी सरपंचांकडून 432 लोकांना बनावट उताऱ्यांचं वाटप, विद्यमान सत्ताधाऱ्यांचा आरोप

ग्रामसभेच्या प्रोसेडिंग बुकमध्ये बनावट ठराव टाकून गावठाण जमिनीचे मालकी हक्क दाखवणारे नमुना नंबर 8 चे सात बारा उतारे तयार करून ग्रामस्थांकडून देऊन कोट्यवधीं रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकार समोर आला  आहे.

जळगावच्या लोहारा ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार, माजी सरपंचांकडून 432 लोकांना बनावट उताऱ्यांचं वाटप, विद्यमान सत्ताधाऱ्यांचा आरोप
जळगाव लोहारा
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Oct 08, 2021 | 3:36 PM
Share

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. पदावर असतांना सरपंच ,उपसरपंच , ग्रामसेवकांनी ग्रामसभेच्या प्रोसेडिंग बुकमध्ये बनावट ठराव टाकून गावठाण जमिनीचे मालकी हक्क दाखवणारे नमुना नंबर 8 चे सात बारा उतारे तयार करून ग्रामस्थांकडून देऊन कोट्यवधीं रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकार समोर आला  आहे. विद्यमान सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितल्यावर हा मोठा घोटाळा उघडकीस आला.

432 लोकांची फसवणूक

ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण जागा कोणालाही देता येत नाही. सात बारा उतारा ही देता येत नाही, अस असताना लोहारा ग्रामपंचायत चे माजी सरपंच आणि ग्रामवसेवकान बनावट दाखले तयार केले. त्यात सही शिक्का मारून लोकांना सर्रास दाखले देण्यात आले. हे दाखले एक दोन लोकांना नाही तर तब्बल 432 लोकांना हे दाखले देण्यात आले.

निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी आमिष

ग्रामपंचायत निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी गावठाणातील जमिनीवर बांधण्यात आलेली घरं कायमची नावांवर करून सात-बारा देण्याचं आमिष तत्कालीन सरपंच आणि उपसरपंच यांनी गावकऱ्यांना दिल होतं. त्यानुसार तत्कालीन सरपंच मालतीबाई संजय पाटील, उपसरपंच कैलास संतोष चौधरी यांनी 432 ग्रामस्थांकडून पैसे घेऊन घरी जाऊन वार्ड निहाय बनावट सातबारा दिला, असा आरोप सध्याचे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी केला आहे. निवडणूक संपल्यावर लाभार्थी ग्रामस्थ ज्यावेळी नवा सात बारा उतारा घेण्यासाठी आले त्यावेळी हा दाखला बनावट असल्याचं लक्षात आलं. गावठाण जमिनीचा सात बारा उतारा देण्याचा कुठलाही आदेश सरकार कडून नसल्याचं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

तत्कालीन सरपंच, उपसरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्यावर आरोप

सातबारा उतारा घेणाऱ्या ग्रामस्थांनी नविन सरपंच यांना भेटून हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर विद्यमान सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितल्यावर हा मोठा घोटाळा उघडकीस आला. गावातील 432 लोकांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं. 2019 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर ग्रामसभा घेऊन तत्कालीन सरपंच मालतीबाई संजय पाटील, उपसरपंच कैलास संतोष चौधरी यांनी ग्रामविकास अधिकारी आर टी बैसाणे यांनी संगनमत करून नामुना नंबर 8 चे बनावट उतारे 7/ 12 तयार करून वाटप करून मोठा भ्रष्टाचार केल्याचं उघड झाले. या प्रकरणी तत्कालीन सरपंच , उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी यांच्या सह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विद्यमान सरपंचांनी केलेल्या आरोपांवर माजी सत्ताधाऱ्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

इतर बातम्या:

‘माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस

अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन, छापेमारीचा तीव्र निषेध

Jalgaon Pachora Lohara Grampanchayat ex Sarpanch and ex village development officer gave duplicate land records to people alleged by present sarpanch Akshay Kumar Jaiswal

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...